जगेन तर महाराष्ट्रासाठी मरेन तर महाराष्ट्रासाठी असे कोण mhalale
Answers
Answer:
प्रबोधनकार ठाकरे
Step-by-step explanation:
कामगिरी बजावली. नवयुगला २० वर्षे झाली त्यावेळी अत्र्यांनी बाळ आणि श्रीकांत ठाकरेंचे तोंडभरून कौतुक केले. या दोघांनीही नवयुगच्या लोकप्रियतेत जी भर टाकली, तिला तोड नाही, असे ते म्हणाले.
दैनिक मराठा निघाल्यानंतर १५ दिवसांनी अत्र्यांच्या अभिनंदनासाठी शांतारामाच्या चाळीत सभा भरली. या सभेत मुख्य वक्ते होते, आप्पा आणि लालजी पेंडसे. या सभेचे अध्यक्ष होते, प्रबोधनकार ठाकरे.
ठाकरे आणि अत्रे शैली
संयुक्त महाराष्ट्राच्या काळात या दोघांच्याही लेखणीची तलवार आणि वक्तृत्वाचा दांडपट्टा महाराष्टाच्या विरोधकांवर सपासप चालत होता.
त्याची दोन नमुने पाहा - अत्रे लिहितात, अमानुष अत्याचाराने संतप्त झालेल्या तीन कोटी जनतेला वाघनखे फुटतील आणि द्विभाषिकाचा कोथळा बाहेर काढला जाईल. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलकांवर गोळ्या घालणारांचे हात महारोग होऊन झडून जावोत. त्यांना रक्तपिती होऊन मरण येवो. 'त्यावर एवढी जहाल भाषा बरी नव्हे', अशी टीका करण्यात आली. त्याला उत्तर देताना अत्रे म्हणाले, 'हे शब्द माझे नाहीत. ज्यांची कर्ती मुले या गोळीबारात मारली गेली, त्यांच्या आईबापांचे हे शिव्याशाप आहेत.'
दुसरीकडे शिवाजी पार्कवरच्या सभेत प्रबोधनकार म्हणाले, 'काँग्रेसच्या पेटीत काय आहे? या पेटीत जागोजागी शिवरायांची बदनामी, भगिनींच्या कुंकवाचे सारवण, पिचलेल्या बांगड्या, एकशे पाच भावांचे रक्त आहे, तिथे तुम्ही आपले मत द्याल काय?'
अत्रे आणि ठाकरेंची लेखणी वाणी संयुक्त महाराष्ट्राच्या काळात अशी आग ओकत होती.
बुंदेलखंडाच्या छत्रसाल राजाने पहिल्या बाजीरावाला दिलेल्या मदतीच्या हाकेप्रमाणे प्रबोधनकारांनी केंद्रात असलेल्या सी. डी. देशमुखांना म्हटले, 'जो गत भई गजेंद्र की सो गत भई आज। बाजी जान बंबई की महाराष्ट्र की राखो सीडी लाज।।'
संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यावर चिंतामणरावांनी राजीनामा देताच अत्र्यांनी लिहिले, चिंतामणी देशाचा कंठमणी झाला!
तर सीडींनी द्वैभाषिकाचा तोडगा स्वीकारल्यावर द्वैभाषिकाचे गाडलेले मढे तुम्हाला लखलाभ, असे प्रबोधनकारांनी पुन्हा ठणकावले.
चळवळीत एकत्र काम करणार्या या मित्रांचे परस्परांच्या महाराष्ट्र प्रेमाचेही कोण कौतुक होते.
झुंजार महारथी
१५ नोव्हेंबर १९५९ रोजी झालेल्या मराठाच्या तिसर्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना प्रबोधनकार म्हणतात, जगेन तर महाराष्ट्राकरता नि मरेन तर महाराष्ट्राकरता ही मराठ्याची जिद्द आहे. काँग्रेस निष्क्रीय झाली तेव्हा लोकमान्य टिळक आणि ऍनी बेजंट यांनी होरूल लीग काढून स्वराज्याचा झेंडा फडकावला. त्याचप्रमाणे समितीतील शैथिल्य नष्ट करण्यासाठी जनता आघाडीचा आणि मराठ्याचा जन्म आहे. इतिहासाची पुनरावृत्ती आहे. आचार्य अत्रे हे जनता जनार्दनाने बनवलेले संयुक्त महाराष्ट्राचे यंत्र आहे.
तर ठाकरेंच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त अत्रे मराठात लिहिलेल्या लेखात म्हणतात, केशवराव संयुक्त महाराष्ट्राच्या महाभारतातले एक झुंजार महारथी आहेत. जन्मभर महाराष्ट्रावर जाज्वल्य प्रेम करणारा माणूस.
मराठी जनतेच्या हितासाठी 'शुद्ध महाराष्ट्रीय पक्ष' स्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी दोन तपापूर्वी व्यक्त केली आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या निमित्ताने त्यांची ही इच्छा पूर्ण झाली.
त्यांचे सारे आयुष्य धार्मिक आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध बंड करण्यात आणि लढण्यात गेले. म्हणून त्यांच्या ६०व्या वाढदिवशी नवयुगमध्ये अभिनंदन करताना आम्ही त्यांचा उल्लेख महाराष्ट्राचे ब्राम्हणेतर बंडखोर असा केला होता.
लोकहितवादी, महात्मा फुले, आगरकर यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला जागृत करण्याचे जे महान कार्य सतत दोन तप ठाकरे यांनी केले, ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी बजावलेल्या अविस्मरणीय कामगिरीने खचित सार्थकी लागले आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एके ठिकाणी जमाव संतप्त झाला होता. प्रबोधनकार आणि अत्रे गाडीतून जात होते. अत्र्यांनी लगोलग जाऊन जमावाला शांत केले. तेव्हा प्रबोधनकार म्हणाले, अरे या बाबुरावाला माझं उरलेलं आयुष्य मिळू दे...
मैत्रीला दृष्ट
संयुक्त महाराष्ट्रासाठी राजकीय पक्षांशी संबंधित नसलेले पाच प्रमुख सेनापती एकत्र आले होते. सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, पुण्याच्या प्रभात दैनिकाचे संपादक वालचंद कोठारी, माधवराव बागल आणि आचार्य अत्रे. त्यांना संयुक्त महाराष्ट्राचे पंचायतन म्हणत. त्यांना एकत्र ठेवण्याचे काम केले होते अत्रे आणि ठाकरेंच्या मैत्रीने. पण लोकांच्या हृदयातील या देवतांच्या मैत्रीला दुदैर्वाने दृष्ट लागली. संयुक्त महाराष्ट्र समिती तर फुटलीच, पण प्रबोधनकार आणि अत्र्यांमध्ये मोठा दुरावा निर्माण झाला.
एकमेकांवर कौतुकाची फुले उधळणार्या अत्रेंनी मराठातून