जगात आर्थिकदृष्ट्या भारताचा कितवा क्रमांक आहे?
Answers
Answer:
भारतीय अर्थव्यवस्थेने जागतिक क्रमवारी पाचवे स्थान पटकावले आहे. 2019 या वर्षामध्ये इंग्लंड आणि फ्रान्सला मागे टाकत भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्हिव्ह या इंग्लंडस्थित संस्थेच्या अहवालानुसार ही क्रमवारी समोर आली आहे. भारत एक खुली अर्थव्यवस्था म्हणून विकास पावते आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. 2.94 ट्रिलियन डॉलरच्या जीडीपीसहीत भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे.
2019 मध्ये इंग्लंड आणि फ्रान्सला मागे टाकत भारताने हे स्थान पटकावले आहे, असे या अहवालात म्हटले आहे. इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेचा जीडीपी 2.83 ट्रिलियन डॉलर इतका आहे. तर फ्रान्सचा जीडीपी 2.71 ट्रिलियन डॉलर इतका आहे. पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार (पीपीपी) भारताचा जीडीपी 10.51 ट्रिलियन डॉलर इतका आहे. या निकषानुसार भारताने जपान आणि जर्मनीला मागे टाकले आहे.
मात्र भारताच्या मोठ्या लोकसंख्येमुळे भारताचा दरडोई जीडीपी 2,710 डॉलर इतकाच आहे. तर अमेरिकेचा दरडोईचा जीडीपी 62,794 डॉलर इतका आहे, असे या अहवालात म्हटले आहे