जगातील प्रत्येकाचे दुख नाहीसे झाले तर..कल्पना करा व लिहा
MARATHI
Answers
Answer:
⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀दुःखाचे महत्व
जगातील प्रत्येकाचे दुःख नाहीसे झाले तर ? तर काय होणार? या जगात सर्वजण दुखी आहेत. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये समाधानी राहणारा मोजका कोणीतरी एकटा मिळेल. सुख हे सर्वांना प्राप्त होत नाही. पण दुख मात्र भरपूर आहे अशी शंका करणारे कित्येक लोक आपल्याला मिळतील. श्रीमंत असला तर कामाचा ताण, गरीब असला तर आज आपल्याला काही खायला मिळणार का ह्याचा ताण, विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण अशा कितीतरी कारणामुळे आपण दुःखी होतो.
दुःखी होण्यासाठी कारण इतर भरपूर आहेत पण छोट्या छोट्या गोष्टीतून समाधान मिळणे व आनंद मिळणे ही गोष्ट सर्वांनी शिकली पाहिजे. जर आपल्याला आपल्या जीवनात काही मिळाले नाही तर मात्र आम्हाला भरपूर दुःख होतो व आपण डिप्रेशनचाही शिकार होतो. पण दुःख झाल्यामुळे आपल्याला ठराविक गोष्टींचा अनुभवही प्राप्त होतो. आपल्याला ते ज्ञान प्राप्त होते तिचे जे श्रीमंत माणसांना देखील प्राप्त होत नाही.
दुःख नसला तर सर्वजण आरामात जीवन जगतील, कोणालाही कसलीच भीती वाटणार नाही. पण जर दुःख नसेल तर को माणुसकीच सर्वत्र प्रदर्शन होतील, दुःखामुळे मिळणारे काहीतरी करून दाखवण्याची प्रोत्साहन नाहीसे होणार, दुखा नसला तर आपल्याला एखाद्या वस्तूचे महत्व समजणार नाही.
कितीही झाले तरी दुःखापासून आम्हाला खूप काही शिकायला मिळते व ते आपण कधीच विसरत नाही.