जगातील सर्वात मोठी परिसंस्था कोणती आहे ती सांगा ?
Answers
Answer:
पृथ्वीवरील विशाल जीवसंहतीचे लहान एकक. परिसंस्था ही संज्ञा परि (भोवतालचे) हा उपसर्ग संस्था या शब्दाला जोडून तयार झालेली आहे. परिसंस्थेत सजीव (वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव) आणि त्यांच्या पर्यावरणातील अजैविक घटक (हवा, पाणी, खनिजे, माती) एकत्र राहतात आणि ते एकमेकांवर अवलंबून असतात.
व्यापक अर्थाने जलपरिसंस्थेच्या ही जगातील सर्वात मोठी स्थलीय परिसंस्था आहेत.
जगातील परिसंस्थांचे भूमी परिसंस्था व जल परिसंस्था असे दोन गट केले जातात. जलपरिसंस्थेचे खाऱ्या पाण्यातील व गोड्या पाण्यातील परिसंस्था असे दोन प्रकार पडतात.
सागरी किनाऱ्यापासून खोल अंधाऱ्या सागरी तळापर्यंतच्या सर्व भागांत आढळणाऱ्या परिसंस्था सागरी परिसंस्थेत मोडतात. प्रत्येक परिसंस्थेत वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांसारखे जैविक घटक आणि हवा, पाणी, पोषकद्रव्ये व सौरऊर्जा यांसारखे अजैविक घटक असे दोन मुख्य घटक असतात. कोणत्याही परिसंस्थेत सजीव-सजीव, सजीव-पर्यावरण अशा आंतरक्रिया व्यापक स्तरावर घडून येत असतात.