जगातील सर्वात प्राचीन शिलालेख कोणत्या संग्रहालयात ठेवलेला आहे?
Answers
जगातील सर्वांत प्राचीन शिलालेख फ्रान्सच्या संग्रहालयात ठेवलेला आहे.
ड) फ्रान्सच्या
Explanation:
अधिक माहिती:
फ्रान्समधील प्राचीन शिलालेख:
१. फ्रान्समधील लुव्र या संग्रहालयात जगातील सर्वांत प्राचीन शिलालेख ठेवला आहे.
२. हा शिलालेख सुमारे ४००० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन आहे.
३. सुमारे ४००० वर्षांपूर्वी सुमेर संस्कृती अस्तित्वात होती. त्याच काळातील हा प्राचीन शिलालेख आहे.
४. या शिलालेखावर अनेक प्रकारची कोरीव चित्रे आहेत.
५. सुमेर साम्राज्यातील राजे, राजांची युद्धे, संघर्ष, करार यांच्या नोंदी या शिलालेखावर आहेत.
६. तसेच सुमेर संस्कृतीतील काही पराक्रमी योद्ध्यांची चित्रे या शिलालेखावर कोरलेली आहेत.
शिलालेख:
१. 'शिला' म्हणजे 'दगड' आणि 'लेख' म्हणजे 'लिखित साहित्य'.
२. ज्या दगडावर एखादी गोष्ट लिहिलेली अथवा कोरलेली असते, त्याला शिलालेख असे म्हणतात.
३. प्राचीन काळात कागदाचा शोध लागला नव्हता. तेव्हा झाडाची पाने, दगड, ताम्रपट ( तांब्याचे पात्र ) इत्यादींचा लिखानासाठी उपयोग केला जात असे.
४. प्राचीन शिलालेख हे आपल्या संस्कृतीचे व इतिहासाचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहेत. म्हणून, त्यांचे जतन विविध संग्रहालयांत केले जाते.
Mark as brainlest