Art, asked by shruti2613, 1 year ago

जगात रंग नसते तर .....या विषयावर निबंध

Answers

Answered by SauravKumarChaudhary
26
रंगाशिवाय काहीच मज्जा नाही. हे रंग जर नसते तर कल्पना करा आपलं आयुष्य कसं झालं असतं. नुसतं काळं आणि पांढरं. जुन्या चित्रपटात जसं दिसायचं अगदी तसंच. या रंगांशिवाय राहण्याची कल्पनाच करवत नाहीय ना! या प्रत्येक रंगाविषयी आपल्या मनात काहीना काही आकर्षण असतं.

हे रंग आपल्या आवडीचे ठरू लागतात. अगदी कपडे निवडताना देखील आपण अशाच रंगाच्या कपडय़ांची निवड करतो. यात लाल, पांढरा, निळा, हिरवा, पिवळा असे काही कॉमन रंग असतात.

पण रंगाचं एक मानसशास्त्र असतं. काही दिवसांपूर्वी काळा रंग आणि त्याचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर कसा प्रभाव पडतो याबद्दल जाणून घेतलं होतं.

नेहमीच्या वापरातील अशा काही रंगांविषयी आणि त्या रंगाचे कपडे परिधान केल्यावर त्याचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर काय परिणाम होत असतो हे जाणून घेणार आहोत.

लाल
लाल आणि या रंगाच्या इतर छटा मुलींच्या आवडत्या रंगांपैकी एक. जे लाल रंगाची निवड करतात ते अधिक आशादायी आणि कार्यक्षम असतात असं रंगाचं मानसशास्त्र सांगतं. वॉर्म कलर्स म्हणजे उष्ण रंगप्रकारामध्ये हा रंग येतो. उत्साह, क्रिया, इच्छाशक्ती याचा हा रंग प्रतीक आहे. हा रंग इतका भडक असतो की, या लाल रंग छटेच्या कपडय़ांमुळे एखाद्याचं लक्ष तुमच्याकडे पटकन खेचलं जातं. त्यामुळे लोकांच्या नजरा तुमच्यावर अधिक असाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर अशा रंगसंगतीला पसंती दिली जाते.

हिरवा
रंग छटांमध्ये जे शीत रंग आहेत त्यामध्ये हिरव्या रंगाचा समावेश आहे. त्यामुळे जर तुम्हाला शांत राहणं पसंत आहे किंवा तुमचं व्यक्तिमत्त्व तसं भासावं असं तुम्हाला वाटत असेल तर हिरव्या रंगछटेच्या कपडय़ांची निवड करा. तसंच अशा रंगसंगतीमुळे तुमचं व्यक्तिमत्त्व समोरच्या व्यक्तीला शांत आणि प्रसन्न वाटतं.

निळा 
निळा हा मुलांचा आवडता रंग आहे असं म्हणतात. पण फक्त मुलांनाच नाही तर मुलींवर देखील या निळ्या रंगछटेचे कपडे अधिक खुलून दिसतात. या रंगाची एक मानसिकता अशी आहे की हे रंग तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक सकारात्मकरित्या लोकांसमोर आणत असतात. एका रिसर्चच्या म्हणण्यानुसार मुलाखतीला जाताना किंवा आपल्या क्लाएंटला भेटायला जाताना निळ्या रंगसंगतीचे कपडे घालावे. हा रंग तुम्ही खूपच प्रामाणिक आणि खरे आहात असं दर्शवत असतो. अशा रंगामुळे समोरच्या व्यक्तीचा विश्वास तुम्ही संपादन करत असता. या निळ्या रंगाच्या काही छटा इतक्या प्रभावी असतात की तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक खुलून येतं.

पांढरा
आपल्याकडे पांढ-या रंगाचे कपडे कोणी घातलेले दिसले की ते एकतर राजकारणी असावे किंवा कॉर्पोरेट ऑफिसर असावेत असा एक समज आहे. तसंच या रंगावर चुकून जरी डाग पडला तरी तो दिसून येतो. त्यामुळे बरेच जण पांढ-या रंगाचे कपडे घालायला टाळाटाळ करतात. पण यातच या रंगाची खरी मानसिकता दडली आहे. या रंगामुळे तुमची एक छाप समोरच्या व्यक्तीमध्ये तयार होते. तुम्हाला टापटिप आणि नीटनेटकं राहायला आवडतं, तुम्ही सकारात्मक, शांत किंवा आध्यात्मिक आहात असा समज हा रंग तयार करत असतो.

पिवळा
पिवळा हा भडक रंग. आपल्याकडे तसं सण किंवा कार्यक्रमांमध्ये अशा रंगाचा वापर केला जातो. रोजच्या जीवनात बरेच जण या रंगाच्या थोडय़ा फिक्कट रंगछटांची निवड करतात. हे रंग तुमचं व्यक्तिमत्त्व हसरं, खेळकर, खोडकर आहे असं प्रतीत करत असतात


shruti2613: thanks
SauravKumarChaudhary: please mark as brain list
Similar questions
Hindi, 7 months ago