जगभरातील 16 हवामान घटकांचा अभ्यास करून
चा अंदाज व्यक्त करण्याचे प्रारूप
बनविण्यात आले.
9:56
1 भूकंपाचे
2 वादळाचे
3 मान्सूनचे
4 बर्फवृष्टीचे
message
Answers
Answer:
यासंबंधी तो विचार करू लागला. अशा प्रकारे आपल्याभोवती होणाऱ्या वाता-वरणातील घडामोडींसंबंधी ज्ञान मिळविण्यास त्याने प्रयत्न सुरू करून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग करण्यास सुरुवात केली. निरनिराळ्या मानवी कार्यांत प्रगती झाल्यामुळे नैसर्गिक आपत्तींसंबंधी अंदाज मिळविण्याची त्याला गरज भासू लागली.
ऐतिहासिक सर्वेक्षण : [→ वातावरणविज्ञान]. वातावरण-विज्ञानाची सुरुवात प्राचीन ग्रीसमध्ये झाली असल्याचे आढळून येते. प्रसिद्ध ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटल (इ. स. पू. ३८४–३२२) यांनी मिटिओरॉलॉजिका नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात वातावरणविज्ञानासंबंधी माहिती दिलेली आहे. ग्रीक संस्कृती उत्कर्षावस्थेत असताना मानवी कार्यासाठी हवामानाचे उपयोजन करण्याचे प्रयत्न झाले. प्राणी आणि किडे यांची प्रतिक्रिया तसेच आकाशाची स्थिती यावरून प्राचीन ग्रीक लोक हवामानासंबंधी अंदाज बांधत असत. थीओफ्रॅस्टस (इ. स. पू. सु. ३७२–२८७) यांनी लिहिलेल्या ‘चिन्हांचे पुस्तक’ या शीर्षकार्थाच्या पुस्तकात हवामानासंबंधी बऱ्याच परिचित म्हणी दिलेल्या आहेत.
सोळाव्या शतकाच्या अखेरपर्यंत वातावरणविज्ञानामध्ये कोणतीही प्रगती झाली नव्हती. सतराव्या शतकात हवेचे दाबमापक व तापमानमापक अशी दोन महत्त्वाची उपकरणे निर्माण करण्यात येऊन त्यांच्या साहाय्याने काही निरीक्षणे घेण्यात आली. त्यानंतर जॉर्ज हॅड्ली या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी वाऱ्यासंबंधी अभ्यास करून १७३५ मध्ये समजावून दिले की, पृथ्वीच्या आसाभोवतीच्या वर्तुळाकार गतीमुळे पूर्वेकडून वाहणारे व्यापारी वारे निर्माण होतात. टॉमस जेफर्सन या अमेरिकन शास्त्रज्ञाने उत्तर अमेरिकेत माँटिसेलो येथे १७७२ मध्ये वातावरणविज्ञानीय निरीक्षणांची सुरुवात केली. बेंजामिन फ्रँक्लिन या अमेरिकन शास्त्रज्ञांना त्यांच्या निरीक्षणांवरून असे आढळून आले की, पावसाळी वादळ फिलाडेल्फियानंतर एक दिवसाने बॉस्टनला होते. फिलाडेल्फिया बॉस्टनपासून ८०० किमी. नैर्ऋत्येस आहे. त्यांनी यावरून अंदाज बांधला की, दोन्हीही ठिकाणी भूपृष्ठीय वारा ईशान्येकडून वाहत असला, तरी दोन्हीही ठिकाणांवरील पाऊस एकाच वादळ प्रणालीपासून पडत असला पाहिजे.
इ. स. १८३५–४० या दरम्यान केलेल्या अभ्यासावरून काही वातावरणविज्ञांना कळून आले की, उत्तर गोलार्धात ⇨हरिकेना भोवती वारे प्रत्यावर्ती (घड्याळाच्या काट्याविरुद्ध दिशेत) असतात. ॲडमिरल आर्. फिट्सरॉय यांनी हवेच्या दाबावरून हवामानासंबंधीच्या अंदाजाकरिता काही नियम केले. त्याच सुमारास बिस्बीलॉट्स यांनी भूवलनोत्पन्न वाऱ्याची संकल्पना काढली. नंतर डब्ल्यू. फेरल यांनी गास्पार ग्यूस्ताव्ह द कोरिऑलिस (१७९२–१८४३) यांची सैद्धांतिक फले वापरून हॉलंडमधील किनारपट्टीकरिता वादळभयसूचना सेवा सुरू केली.[ →कोरिऑलिस परिणाम].