Jagatil tambaku virodhi din kadhi sajara kela jato
Answers
Answer:
व्यसनधारी व्यक्ती फक्त स्वत:लाच अडकून घेत नाही तर या व्यसनात डुबलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला आणि राष्ट्राला याचा फटका बसत असतो. या व्यसनी लोकांच्या व्यसनामुळे अनेक पिढ्या बरबाद होत आहेत. तरुण पिढी ही चंगळवादी, व्यसनाधीन बनून स्वत:बरोबर राष्ट्राचीही फार मोठी हानी करीत आहेत. आज काही समाजातील, कार्यालयातील तसेच कामगार, मजूर, कष्टकरी यांच्यातील सर्वात वाईट व्यसने हे तंबाखू आणि चुना मिश्र करुन चघळणे, बिडी सिगारेट ओढणे, गुटखा खाणे या तंबाखूजन्य पदार्थाचे आहे. यामुळे अनेकांना घशाचे, तोंडाचे, जिभेचे, श्वसन नलिकेचे आजार झाले व आजारपणात अनेकांचे मृत्यूदेखील झाले. परंतू तंबाखू खाणे व बिडी सिगारेट ओढणे कमी झाले नाहीत. उलट कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व कारकून यांच्यात चुनामिश्रीत तंबाखू खाण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. तोंडाचा कँन्सर होतो, जीभ रठ पडते, बोलता येत नाही, जीभ काळी पडते, वेळप्रसंगी ती कापून टाकावी लागते. तंबाखू खाणे व बिडी सिगारेट ओढल्याने पूर्ण तोंडाची दुर्गंधी येते. तंबाखूमध्ये अनेक विषारी रासायनिक पदार्थ असतात. चुनादेखील शरीरासाठी अत्यंत घातक आहे. बिडी सिगारेट, चुना तंबाखू मिश्रण, पानामध्ये तंबाखू हे का नकोत कारण या पदार्थाचे दुष्परिणाम इतर दुसऱ्या कोणत्याही व्यसनी पदार्थापेक्षा अधिकच असतात. तंबाखू म्हणजे साक्षात विषच होय. हे विष मानवांनी घेऊन कतृत्वहीन बनणे योग्य वाटत नाही. तंबाखू का नको, तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणे म्हणजे साक्षात मृत्युलाच निमंत्रण होय. इतर कोणत्याही व्यसनानी मृत्यू पावणारे तंबाखूच्या तुलनेने कमी आहेत. संपूर्ण विश्वात दरवर्षी जवळपास पन्नास लक्ष व्यक्ती मृत्युमुखी पडतात ते केवळ तंबाखू खाण्यामुळेच.