History, asked by studylover32, 15 days ago

जहागिरी या शब्दाचा अर्थ
please tell no smap​

Answers

Answered by dapushree
4

Answer:

प्रश्न

शब्द

इतिहास

जहागिरी म्हणजे काय? इतिहास विषयानुसार जहागिरी शब्दाचा अर्थ काय?

१ उत्तर

प्राचीन काळापासून एखाद्या प्रदेशाची रचना गाव, तर्फ, महाल, सरकार ते राजा याप्रमाणे सुरू झाली. या प्रत्येक घटकाचा कारभार करण्याकरिता विविध पदांची निर्मिती झाली. त्या घटकानुसार या पदाला पाटील, कुलकर्णी, चौगुले, देशमुख, देशपांडे, शेटे, महाजन या पदांची निर्मिती झाली. सदरील पदांचे महत्त्व एवढे वाढले की, वतनदारांनी त्याला आडनाव म्हणून स्वीकारले, ही पदे वंशपरंपरागत असल्याने वतनदाराच्या मोठ्या मुलास ते मिळत होते. इतर वारसांना यात कुठलाही वाटा नसला तरी केवळ प्रतिष्ठा म्हणून अगदी सर्वांनीच पाटील, देशमुख, कुलकर्णी यांसारख्या वतनांची नावे आपल्या आडनावात घेतली.

वतनदार हे राजा आणि जनता यामधील दुवा असून वतन हा मूळचा अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ होतो- वर्तन, स्वदेश, जन्मभूमी. कारभा-यांना गावाकरिता किंवा देशाकरिता करत असलेल्या कर्तव्याबद्दल त्या व्यक्तीला उपजीविकेकरिता वंशपरंपरेने चालणारे उत्पन्न म्हणजे वतन होय. ते धारण करणाराला वतनदार म्हटले गेले. यासोबत इनामदार, जहागिरदार, मनसबदार, सरंजामदार हे एकाच संकल्पनेत मोडतात.

वतनदारीची पद्धत प्राचीन असली तरी १६१४ ला निजामशाहीचा प्रधान मलिक अंबरने यात सुसूत्रता आणून महसुलाचे अधिकार गावांना दिल्याने खेडी स्वयंपूर्ण झाली. परंतु वतनदारांचा वरचढपणा वाढला. कान्होजी जेधे, बाजी पासलकर, कोयाजी बांदल यासारखी सर्व मंडळी आदिलशहाची जहागिरदार असूनही स्वराज्यासाठी त्यांनी वतनावर पाणी सोडले. शिवरायांनी देशमुखीला वठणीवर आणताच अनेकजण त्यांच्या विरोधात गेले. पुढे छत्रपती राजारामांनी परत वतनदारी सुरू केली तेव्हा स्वातंत्र्यलढ्याला जोर आला.

मानवी इतिहासाच्या प्रारभींच्या कालीं सर्व जमीन कोणाच्याहि मालकीची नसून अविभक्त स्थितींत होती. ज्याला वाटेल त्यानें वाटेल तितकी जमीन कसावी व खावी. हळूहळू समाज स्थायिक होत जाऊन जमीनीवर मालकी उत्पन्न झाली व पुढें दुर्बलांनां दुसर्‍या प्रबळ लोकांच्या आश्रयाखालीं जावें लागून त्यांचे अंकित अगर दास बनावें लागलें. जमीनीच्या मालकीच्या इतिहासांत कुलवसाहत हीच पहिली पायरी आहे असें कांहींचें म्हणणें आहे. हळूहळू जमीनीची मालकी कायम झाल्यावर मालकास जमीनीची मशागत करण्यास नोकर व बायका लागूं लागल्या व पुढें गुलामपद्धति अस्तित्वांत आली.

पूर्वी एतद्देशीय राजांच्या अमदानींत जमीनीची देखरेख करण्याकरितदां नेमलेले अधिकारी अगर सारा वसूल करण्याकरितां नेमलेले अधिकारी होते त्यांच्यामधून हा निर्माण झाला असावा, नगर लहानलहान खेड्यांचे नगर तालुक्यांचे जे अधिपती होते त्यांची सत्ता नाहींशी होऊन ते फक्त जमीनदार झाले असावेत, अगर पूर्वीच्या व ब्रिटिश सरकारच्याकडून मोहबतीखातर ज्यांनां जमिनी देण्यांत आल्या त्यामुळें हा जमीनदारांचा वर्ग निर्माण झाला असावा.

Similar questions