India Languages, asked by stasneem045, 3 months ago

jahirat lekhan on gift house in marathi​

Answers

Answered by shreyansjain4
0

Answer:

जवळ असूनही आई-वडिलांविना दिवाळी साजरी करताना होणारी तिच्या मनाची घालमेल जाहिरातींनी टिपली आहे. तिच्याही आई-वडिलांसोबत दिवाळी साजरी करणे आणि त्यातून मुलींचे कुटुंबही मुलाच्या कुटुंबाइतकेच महत्त्वाचे आहे, हा संदेश या जाहिराती देत आहेत.

ती, दिवाळी आणि जाहिरात

सौरभ रत्नपारखी

दरवाजावर टकटक वाजते, 'उठा.. उठा, दिवाळी आली'ची साद ऐकू येते. टीव्हीच्या छोट्या पडद्यावर 'अलार्म काका' दर वर्षीप्रमाणे दिवाळी जवळ आल्याची आठवण करून देतात आणि तिची नजर हळूच दिनदर्शिकेच्या पानांकडे जाते.

हे दृश्य आता परिचयाचे झाले आहे. जस जसा संयुक्त कुटुंबपद्धतीकडून विभक्त कुटुंबपद्धतीकडे प्रवास सुरू झाला, तस तशा अनेक प्रथा-परंपरा कालौघात मागे पडत गेल्या. पूर्वी घरात एखादी जुनी जाणती, कर्तीसवरती व्यक्ती असायची. जिच्या अस्तित्वाचा धाक घरभर जाणवायचा. त्या धाकापायी अथवा सण-उत्सवाच्या उत्साहामुळे सर्व घराची आवराआवर किमान महिनाभर आधीच सुरू व्हायची. घरातल्या गोधड्या धुणे, भिंती रंगवणे, जमिनी सारवण्यापासून सगळ्या जावा-नणंदांनी एकत्रित मिळून केलेल्या फराळापर्यंत कित्येक आठवणी घरोघरी आजही ताज्या आहेत; पण गेली काही वर्षे या परंपरेत होत जाणारा सूक्ष्म बदल प्रसारमाध्यमांतूनही जाणवत आहे. पूर्वी बाहेरच्या शहरात शिकणाऱ्या मुलीचे किंवा व्यवसायानिमित्त स्थिरावलेल्या मुलींचे अप्रूप वाटण्याचा काळ होता; पण आता तिचा परीघ वाढला आहे. आता ती दुसऱ्या शहरात नव्हे, तर दुसऱ्या देशातही स्थिरावत आहे. मग अशा वेळी दिवाळसणाचा तिचा आनंद अधोरेखित करण्याचं काम ऑनलाइन बँकिंग किंवा ऑनलाइन शॉपिंग कंपनी करते. तिची भाऊबीजेची ओवाळणी किंवा भेट तिला डिजिटल माध्यमातून मिळते. व्हिडिओ कॉल नावाच्या घरोघरी लोकप्रिय झालेल्या तंत्रज्ञानाच्या प्रकारामुळे सातासमुद्रापारचे अंतरही तिच्या सुखाला अडसर ठरत नाही.

ती बदलत आहे, तिचा परीघ बदलत आहे आणि त्याची जाणीव ठेवून बदलणाऱ्या समाजाचे प्रतिबिंब जाहिरात माध्यमातूनही जाणवत आहे. ती 'अम्माकी दिवाली'ची जाहिरात आठवते का? एक वृद्ध पणती विक्रेत्या महिलेला एक लहानसा चिमुरडा सर्व पणत्या विकल्या जाव्यात म्हणून मदत करतो. घरात आजी-आजोबा नसल्याचे दुःख थोड्या वेगळ्या भावनेतून त्या जाहिरातीने चित्रबद्ध केले, म्हणायला हरकत नाही. काही वर्षांपूर्वी स्त्रियांचे लग्नाचे सरासरी वयही कमी होते. तिची व्यवसाय करण्याची अथवा अधिक शिक्षण घेण्याची उर्मी अधिक फुलून येण्याआधीच कोमेजली जाई. आयुष्याचा अधिकांश भाग सासरी गेल्यामुळे त्याच्याशी जुळवून घेणे पारंपरिक मानसिकतेतून वयाच्या दृष्टिकोनातून एका अर्थी सोपे होते; पण आता महिलांचा व्यवसाय आणि शिक्षणाच्या जागरुकतेत इतकी वाढ झाली आहे, की लग्न होईपर्यंत अनेकदा अर्ध आयुष्य माहेरी गेलेले असतं आणि सासरच्या नव्या प्रथा परंपरांशी शून्यातून सुरुवात करून जुळवून घेताना कधीकधी दमछाक होते. हे हेरण्याचे काम जाहिरातविश्व करत आहे. एकुलती एक मुलगी लग्न करून सासरी कुटुंबासह दिवाळी साजरी करीत असते किंवा मुलगी सासरी अन् मुलगा परदेशी असतो. त्यावेळी मुलीचे आई-वडील मात्र दिवाळीसारख्या सणालाही एकटेच असतात. अशावेळी जवळ असूनही आई-वडिलांविना दिवाळी साजरी करताना होणारी तिच्या मनाची घालमेलही या जाहिरातींनी टिपली आहे. तिच्याही आई-वडिलांसोबत दिवाळी साजरी करणे आणि त्यातून मुलींचे कुटुंबही तितकेच महत्त्वाचे आहे, हा संदेश या जाहिराती देत आहेत.

सोने खरेदी करताना होणारा आपल्या बजेटचा विचार, आपल्याला मिळालेल्या दिवाळी बोनसमधून आई-वडिलांना गिफ्ट देण्याचा विचार, घरापासून दूर असलेल्या एखाद्या भाडेकरूला दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्याचा विचार, आपल्या घरकाम सहाय्यकांच्या मुलांनाही दिवाळीचा आनंद मिळावा हा विचार, अनाथाश्रमातून आपल्याला दत्तक घेणाऱ्या आईबद्दल कृतज्ञतेचा विचार असे कित्येक सुंदर विचार तिला केंद्रस्थानी ठेवत जाहिरातविश्व मांडत आहे. ती काळासोबत बदलत आहे आणि जगही तिच्यासोबत बदलत आहे.

माध्यम जगतातल्या कर्त्याधर्त्यांना कल्पना असते, की घरातला रिमोट तिच्याच हातात असतो. काय विकत घ्यावे अथवा नको, हे गृहलक्ष्मीच ठरवते. आजवरच तिचे हे रूप खूपच संकुचित होतं. सध्या माध्यम जगतात होत असलेला हा बदल सुखावणारा आहे. विशेष म्हणजे दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणानिमित्त स्वावलंबी, स्वतंत्र विचारांच्या स्त्रीचं आणि त्याचसोबत तिच्या भावविश्वाचं जे चित्रण होत आहे ते आश्वासक आहे.

मुख्य म्हणजे, या जाहिरातीतला पुरुषसुद्धा तिच्या स्त्रीत्वाचा स्वीकार करणारा आहे. आपली पत्नीही आपल्याप्रमाणेच दिवस-रात्र नोकरी करून थकून घरी येते, याची जाणीव ठेवून तिला फराळ बनवण्यात मदत करू लागणारा आहे. दिवाळीचे निमित्त साधून तिच्या अव्यक्त भावनांना समजून गिफ्ट देणारा आहे. तडजोडी करीत का होईना; पण संसाराचा गाडा दोघांनी मिळून हाकायचा असतो याचा प्रत्ययकारी आनंद देणारा आहे. खरेच काय असतो हा दिवाळीचा सण? अंधारातून उजेडाकडे जायला शिकवतो तोच ना? घरातल्या जळमटांसह जुनाट विचारांची जळमटे काढून टाकायला लावणारा. या सगळ्या बदलांना आणि नाविन्याच्या स्वीकाराला दिवाळीची जोड देत जाहिरातविश्व महिलांच्या भावविश्वाचा दुर्लक्षित केला गेलेला एक महत्त्वाचा पैलू आपल्यासमोर मांडत आहे. केवळ ती नव्हे, तर तिचं कुटुंबही आपल्या कुटुंबाइतकेच महत्त्वाचे आहे. तिच्या आई-वडिलांसोबत दिवाळीसारखा महत्त्वाचा सण साजरा करण्याची तिची इच्छाही पूर्ण होणे गरजेचे आहे, हा महत्त्वाचा संदेश दिवाळीनिमित्त या जाहिरातींच्या माध्यमातून घरोघरी पोहोचत आहे.

Similar questions