India Languages, asked by shrutikavichare8, 4 months ago

जलाचे महत्व किंवा जलहेच जीवन marathi essay​

Answers

Answered by maliye90
0

Answer:

पाण्याचे महत्व मराठी माहिती निबंध, भाषण, लेख

पाणी हा मानवी जीवनाचा मूलभूत घटक आहे. पाणी नसेल तर संपूर्ण जीवसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात येईल. आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचे अपार महत्व आहे.अन्नपदार्थ ग्रहण करणे आणि विष्ठेच्या रूपात बाहेर टाकणे यासाठी पाण्याचाच उपयोग होतो. शारीरिक तापमान समतोल राखण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. हे शरीरातील भागासाठी वंगणाचे काम करते.

पाणी अन्नाच्या प्रत्येक उष्मांकाला आवश्यक असते. म्हणजे रोजच्या १५00 ते २000 आवश्यक कॅलरीजसाठी दररोज ६ ते ८ ग्लास पाणी (१.५ ते २ लिटर) पिणे प्रत्येक दिवसाला गरजेचे असते. आपल्याला येणारा घाम, मूत्र आणि विष्ठेतून पाणी शरीरातून बाहेर उत्सजिर्त केले जाते. या उत्सर्जनाच्या प्रमाणात आपला पाणी पिण्याचा रोजचा कोटा असावा. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त पाणी प्यावे.

Similar questions