jal parduasn visleasn
Answers
Answer:
पाण्यातून होणाऱ्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. विशेषतः पाच वर्षांच्या आतील मुले अशा संसर्गाला बळी पडतात. जगण्यासाठी सजीवांना पाण्याची अत्यंत गरज असते. जगात उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी फक्त 1 ते 1.5 % पाणीच पिण्यायोग्य आहे. कारण पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी जवळजवळ 98 % पाणी हे समुद्र आणि बर्फाच्या स्वरूपात आहे. त्यामुळे पिण्यायोग्य पाणी जपून वापरणे गरजेचे तर आहेच आणि पिण्यायोग्य पाण्यात प्रदूषके मिसळण्यापासून थांबवणेसुद्धा गरजेचे आहे. जलप्रदूषण हे आपल्यासाठी खूप हानिकारक आहे.
जलप्रदुषणाची सामान्य कारणे – कचरा व सभान() याचे वापर करणे
अनेक कारणांद्वारे जलप्रदूषण होत असते
● औद्योगिक रासायनिक पदार्थ पाण्यात सोडण्याने
● सांडपाणी मैलापाणी जलाशयात सोडल्याने,
● रासायनिक खते, कीटकनाशके पाण्यात मिसळल्याने,
● पाण्यातील जीव मृत होऊन कुजल्याने,
● कचरा किंवा तत्सम पदार्थ पाण्यात टाकल्याने,
● जनावरे, कपडे, भांडी नदीच्या ठिकाणी धुतल्याने, मृत जनावरे नदीत टाकल्याने,
● रासायनिक रंगकाम केलेल्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या मूर्तींच्या विसर्जनामुळेपाण्याचे प्रदूषण होते.
● जलप्रदूषणामुळे पाण्यामध्ये जीवाणूंची उत्पत्ती होते असे जीवाणूयुक्त पाणी पिल्याने अनेक रोग उत्पन्न होतात. यामध्ये अतिसार (हगवण), उलटी, कावीळ, विविध प्रकारचे ताप, पटकी, मलेरिया, खोकला, सर्दी यांसरखे विकार होतात.
● रासायनिक पदार्थयुक्त पाणी सेवन केल्यास त्यांचा अत्यंत वाईट परिणाम आपल्या किडन्यांवर होतो. किडन्या निकामी होणे यासारखे गंभीर व्याधी उत्पन्न होतात.