जल,वायू, ध्वनी प्रूषणामुळे आरोग्यावर कोण कोणते विपरित परिणाम होतात.( विस्तार मध्ये लिहा)
Answers
Answer:
जल प्रदूषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात किंवा पाण्याची चव बिघडते, ते घाणेरडे दिसते वा दुर्गंधीयुक्त होते.पाण्याचे प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म बदलल्याने मानव व जलीय सजीवांवर अपायकारक परिणाम करणारी जल प्रदूषण ही प्रक्रिया आहे.
वायू: मानवांमध्ये रोग, अलर्जी आणि मृत्यू देखील होऊ शकतात; हे इतर सजीवांना जसे की प्राणी आणि अन्न पिके यांस हानी पोहोचवू शकते आणि नैसर्गिक किंवा मानव निर्मित पर्यावरण वातावरणास हानी पोहोचवू शकते.२०१४ जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २०१२ मधील वायू प्रदूषणामुळे जगभरात सुमारे ७ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला होता.
ध्वनी: ऐकायला कमी येणे, कानात बेल वाजत राहिल्यासारखा आवाज येणे, झोपेत सतत बिघाड होणे, अस्वस्थता वाटणे, वेदना होणे वा थकवा येणे, कामाच्या ठिकाणी काम करण्याची इच्छा कमी होणे, बोलण्यात अडथळा येणे, हार्मोन्समध्ये बदल होणे यांसारखे दुष्परिणाम ध्वनिप्रदूषणामुळे होतात.