Biology, asked by sutarsonali510, 2 months ago

जलद्राव्य जीवनसत्वे नावे लिहा

Answers

Answered by shubham4998
2

Answer:

जीवनसत्त्वे (Vitamins) हे शरीराच्या आरोग्यासाठी थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे पोषक घटक आहेत. ज्याची सगळ्या जीवांना अल्प प्रमाणात आवश्यकता असते, अशी ही जीवनसत्वे ही आहाराचे अंश आहेत. जीवनसत्त्वे ही कार्बनची संयुगे असतात. ही व्हिटॅमिन्स शरीरामध्ये निर्माण होऊ शकत नाहीत, . याचे २ प्रकार आहेत

जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारी)

स्निग्ध विद्राव्य (स्निग्ध पदार्थात विरघळणारी ) - अ, ड, ई, आणि के ही जीवनसत्त्वे स्निग्ध विद्राव्य आहेत.

जलविद्राव्य जीवनसत्त्वांची कमतरता लगेच लक्षात येते आणि ती शरीरात घेतल्यास कमतरतेची लक्षणेसुद्धा लगेच निघून जातात. उलटपक्षी स्निग्धविद्राव्य जीवनसत्त्वांची कमतरता लगेच लक्षात येत नाही आणि उपचार दिल्यावरही त्यांची कमतरता भरून येण्यास काही वर्षे इतका कालावधी लागतो. जलविद्राव्य जीवनसत्त्वे शरीरात साठून राहत नाहीत. ती अधिक मात्रेत दिली गेल्यास मूत्रावाटे त्यांचे उत्सर्जन होते.

Similar questions