History, asked by balgharesakshi53, 2 months ago

जम्मू काश्मीर मधील सीमापार दहशत वादाच्या दोन घटना लिहा. हल्ला होण्यामागील कारणे​

Answers

Answered by Anonymous
14

Answer:

तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए महम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३९ जवान शहीद झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. या हल्ल्याने देशभर संतापाची लाट उसळली आहे.  देशाला हादरवणाऱ्या या दहशतवादी हल्ल्याशिवाय काश्मीरमध्ये अनेकदा मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील मोठे दहशतवादी हल्ले

२६ ऑगस्ट २०१७ – जैशच्या तीन दहशतवाद्यांचा पुलवामा जिल्हा पोलीस लाइन्सवर हल्ला.

आठ सुरक्षारक्षक शहीद. हल्लेखोरही ठार.

२९ नोव्हेंबर २०१६ – जम्मूतील नागरोटा लष्कराच्या तोफखाना छावणीवर तीन दहशतवाद्यांचा हल्ला. सात जवान शहीद. हल्लेखोरही ठार.

१८ सप्टेंबर २०१६ – बारामुल्ला जिल्ह्य़ातील उरीच्या लष्करी तळावर हल्ला. १८ जवान शहीद, हल्लेखोरही ठार. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये लक्ष्यभेदी कारवाईचा निर्णय.

२५ जून २०१६  – सीआरपीएफच्या बसवर दहशतवाद्यांचा बेछूट गोळीबार. जम्मू-श्रीनगर महामार्गावरील पाम्पोर येथे आठ जवान शहीद.

३ जून २०१६ – पाम्पोर येथे दहशतवाद्यांचा सीआरपीएफ बसवर हल्ला. दोन जवान शहीद. दहशतवाद्यांचा सरकारी इमारतीत आश्रय. दोन दिवस चकमक सुरू. दोन हल्लेखोर, दोन अधिकाऱ्यांसह तीन जण शहीद. एक नागरिकही ठार.

५ डिसेंबर २०१४ – उरीतील मोहरा लष्करी तळावर सहा सशस्त्र दहशतवाद्यांचा हल्ला, १० जवान चकमकीत शहीद, हल्लेखोरही ठार.

२४ जून २०१३ – श्रीनगरमधील हैदरपोरा येथे नि:शस्त्र जवानांच्या बसवर हल्ला. आठ जवान शहीद.

१९ जुलै २००८ – श्रीनगर-बारामुल्ला महामार्गावरील नरबल येथे दहशतवाद्यांनी घडविलेल्या स्फोटात १० जवान शहीद.

२ नोव्हेंबर २००५ – तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या खासगी निवासस्थानाजवळ नौगाव येथे आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी गाडी उडविली. सहा पोलीस शहीद, सहा नागरिक ठार.

२० जुलै २००५ – सुरक्षा दलाच्या वाहनाला आत्मघातकी हल्लेखोराने गाडीने धडक दिली त्यामध्ये तीन सुरक्षारक्षक शहीद, दोन नागरिकही ठार.

२४ जून २००५ – श्रीनगरजवळ दहशतवाद्यांनी घडविलेल्या गाडीच्या स्फोटात लष्कराचे नऊ जवान शहीद.

४ ऑगस्ट २००४ – राजबाग येथे सीआरपीएफच्या तळावर हल्ला त्यामध्ये नऊ जवान शहीद. एक दहशतवादीही ठार.

८ एप्रिल २००४ – बारामुल्ला जिल्ह्य़ातील उरी येथे पीडीपीच्या मेळाव्यावर बॉम्बहल्ला, ११ जण ठार.

२२ जुलै २००३ – अखनूर येथील तळावर करण्यात आलेल्या हल्ल्यात एका ब्रिगेडियरसह आठ जवान शहीद. अनेक अधिकारी जखमी.

२८ जून २००३ – सुजवान लष्करी तळावरील आत्मघातकी हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह १२ जवान शहीद. दोन दहशतवादीही ठार.

१४ मे २००२ – जम्मूतील कालुचाक लष्कर कॅण्टॉनमेण्ट लष्कर तळावरील मोठय़ा हल्ल्यात ३६ जण ठार. तीन हल्लेखोरही ठार.

१७ नोव्हेंबर २००१– रामबन येथील सुरक्षा दलाच्या तळावर हल्ला, १० सुरक्षारक्षक शहीद. ४ दहशतवादीही ठार.

१ऑक्टोबर २००१ – श्रीनगरमधील जुन्या विधिमंडळ संकुलाबाहेर गाडीचा स्फोट घडविला त्यामध्ये ३८ जण ठार. तीन दहशतवादीही ठार.

१० ऑगस्ट २०००– श्रीनगरमधील रेसिडन्सी मार्गावर बॉम्बहल्ला. सुरक्षारक्षक घटनास्थळी येताच स्फोटाने गाडी उडविली. त्यामध्ये ११ जण  आणि  एक वृत्तछायाचित्रकार ठार.

१९ एप्रिल २००० – काश्मीरमध्ये प्रथमच मानवी बॉम्बचा वापर. आत्मघातकी हल्ल्यात दोन जवान शहीद.

३ नोव्हेंबर १९९९ – बदामीबाग लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला, १० जवान शहीद. संरक्षण जनसंपर्क अधिकारी मे. पुरुषोत्तम यांचाही समावेश.

Explanation:

mi marathi

MARATHI BOY

Answered by lokaremegharaj
0

wrong answer

Explanation:

wrong answer

Similar questions