Biology, asked by myronfernandes, 1 month ago

जमिनीची आत्मकथा
in Marathi

Answers

Answered by vrunda1410
7

Answer:

"तुमची माझी ओळख फार जुनी आहे. माझ्याशी खेळताना तुमचे शैशव, बालपण केव्हा हरविले हे सुद्धा तुम्हांला उमगले नाही. आताच जरा या कुमारवयात आल्यावर तुम्ही माझ्याशी फटकून वागायला लागला आहात. म्हणून तर मला तुम्हांला आपली जुनी आठवण करून दयावी लागत आहे. हं ओळखलंत ना! माझ्या स्वागताला तो रुमाल काढू नका. हो, हो! मी माती आहे. मी माती, म्हणजेच आज तुम्हांला नकोशी झालेली धूळ आहे.

पण आठवा पाहू बालपणातील ते दिवस! "लहानपणी माझ्याशी खेळताना तुम्हांला किती मजा वाटायची! माझ्या अंगावर पाणी ओतून वाडे बांधणे, चूलबोळकी तयार करणे, छोटे छोटे शिपाई तयार करणे आणि दिवाळीत किल्ला तयार करणे हे तर तुमचे आवडते खेळ. आज तुम्हांला आठवत नसेल, पण तुमच्यापैकी कित्येकजण रांगत असताना माझी चवदेखील घेत होता. त्यामुळे मग तुम्हांला घरातल्या मोठ्या माणसांचा फटका खावा लागे. पण या आठवणीने लाजू नका. अहो, प्रत्यक्ष परमेश्वरही कृष्णावतारात माझ्याशी खेळताना रंगून जात असे. म्हणून तर पंडित कवी मोरोपंत त्याला आठवण देतात

'तुलाचि धरी पोटिशी कशी तदा यशोदा बरे

जरी मळविशी रजोमलिन तू काय अंबरे!!' "मुलांनो, मी फार पुरातन आहे. या पृथ्वीतलावर तुम्ही मानव नव्हता, इतकेच काय कोणीही प्राणिमात्र नव्हते. अशा एकाकी अवस्थेतही मी वावरत होते. मला कुणी ‘रज' म्हणत, कुणी 'मृत्तिका' म्हणून हाक मारीत. त्यातूनच मला ‘माती' हे नाव मिळाले. मुलांनो, मला फार आवडते हे माझे नाव. का ते सांग? या नावाचे 'मातेशी' साम्य आहे, जवळीक आहे. 'माता' किती मंगल शब्द; किती पवित्र नाते. या मातेशी माझेही नाते आहे हं.

Similar questions