Science, asked by naanuz7750, 1 year ago

जमीन कशाची बनलेली असते?

Answers

Answered by sivachidambaramthang
3

【माती कशी बनते?】

★दगड, गोटे, वाळू, बारीक माती, तसेच कार्बनी पदार्थ मिळून माती बनलेली असते. जमीन खणल्यानंतर मातीचे थर संपले कि त्याखाली खडक लागतात. नदी, पावसाचे पाणी, वाहणारे वारे, आणि हवामानात सतत होणारे बदल यांमुळे खडक आणि शिलाखंड फुटतात, झीज होऊन कालांतराने त्यांचे बारीक कणांमध्ये रुपांतर होते आणि त्याची माती होते. खडकांचे मातीत रुपांतर होणे या क्रियेला खडकांचे अपक्षीणन म्हणतात.  

★सुपीक जमिनीला २.५ सेंमी. जाडीचा मातीचा थर नैसर्गिकरीत्या तयार होण्यास ८०० ते १००० वर्षे लागतात.  

●●जमिनीतील ह्युमस निर्मिती:

★माती हे सूक्ष्मजीवांचे आगर आहे.विविध प्रकारचे असंख्य सूक्ष्मजीव मातीत आढळून येतात. मातीमध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष मिसळले, कि तिच्यातील सूक्ष्मजीव या अवशेषांचे अपघटन घडवून आणतात. त्यातून नायट्रोजनयुक्त संयुगांची निर्मिती होऊन जमिनीची सुपीकता वाढते. वनस्पती आणि प्राणी अवशेषांच्या अपघटनातून तयार झालेल्या मातीला कुपित मृदा (ह्युमस) म्हणतात.

★जमिनीचे / मातीचे महत्त्व:

●१.माती वनस्पतींना आधार देते.

●२.वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी विविध खनिजे, अन्नद्रव्ये मातीतून मिळतात.

●३.वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारे पाणी माती साठवून ठेवते.

●४.माती वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध सूक्ष्मजीवांचेही घर असते.

भारत देश हा भौगोलिकदृष्ट्यावेगळा विविध असल्याने प्रत्येक भागातील/ प्रदेशातील जमीन हि वेगवेगळया प्रकारची आढळते.

जमिनीचे सुपीकतेनुसार प्रकार:

१.गाळाची मृदा

२.तांबडी मृदा

३.काळी/ रेगुर मृदा

४.वालुकामय मृदा  

५.जांभी मृदा

६.खडकाळ मृदा

मातीच्या कणांचा आकार:

१.चिकणमाती – ०.०००२ मिमी. पेक्षा लहान  

२.गाळ (silt) – ०.०२२ – ०.०५ मिमी.

३.वाळू – ०.५ मिमी. – २ मिमी.

४.खडी – २ मिमी. पेक्षा मोठे.


sivachidambaramthang: nice
Answered by tiwariakdi
0

Answer:

पृथ्वीचा भूपृष्ठ जवळजवळ संपूर्णपणे रेगोलिथने व्यापलेला आहे, खडक, माती आणि खनिजांचा पृष्ठभागाचा थर जो पृथ्वीच्या कवचाचा बाह्य भाग बनतो.

Explanation:

  • जमीन, ज्याला ग्राउंड किंवा कोरडी जमीन देखील म्हणतात, ही पृथ्वीची घन, स्थलीय पृष्ठभाग आहे जी महासागरात किंवा पाण्याच्या इतर शरीरात बुडलेली नाही.
  • हे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या 29% भाग बनवते आणि त्यात खंड आणि विविध लहान बेटांचा समावेश आहे. ज्या प्रदेशात जमीन समुद्र किंवा तलावांना मिळते त्याला किनारा म्हणतात.
  • जमीन हा पृथ्वीच्या हवामान प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र आणि जलचक्रामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
  • जरी आधुनिक स्थलीय वनस्पती आणि प्राणी जलीय प्राण्यांपासून उत्क्रांत झाले असले तरी, पृथ्वीचे पहिले सेल्युलर जीवन कदाचित जमिनीवर उद्भवले. भूविज्ञान आणि भूगोल यासह अनेक वैज्ञानिक शाखा जमिनीचा अभ्यास करतात.
  • एक तृतीयांश जमीन झाडांनी, 15% पिकांमध्ये आणि दशांश कायम बर्फ आणि हिमनद्यांनी व्यापलेली आहे.
  • पृथ्वीचा भूपृष्ठ जवळजवळ संपूर्णपणे रेगोलिथने व्यापलेला आहे, खडक, माती आणि खनिजांचा पृष्ठभागाचा थर जो पृथ्वीच्या कवचाचा बाह्य भाग बनतो.

#SPJ3

https://brainly.in/question/44153365

Similar questions