Science, asked by sharmagokul8689, 27 days ago

Jaminichi supekta kmi hot aahe kay krave br

Answers

Answered by sumuakolkar77
0

पिकांची फेरपालट करून कडधान्य पिकांचा समावेश केल्याने पालापाचोळा जमिनीत पडून सेंद्रिय पदार्थाचे चक्रीकरण होते. तसेच सेंद्रिय खते जसे जमिनीतून द्यावे.

माती परिक्षणानुसार खतांचा समतोल वापर अपेक्षित उत्पादन समीकरणाद्वारे केल्यास जमिनीच्या सुपीकतेबरोबर जमीन आरोग्यही चांगले राहील.

माती परिक्षणाद्वारे कमतरतेनुसार सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर जमिनीतून सेंद्रिय खतात मिसळून करावा.

माती परीक्षण करून विद्राव्य खतांद्वारे ठिबक सिंचनातून अन्नद्रव्ये पीक

वाढीच्या अवस्थेत गरजेनुसार द्यावीत.

पाण्याचा अमर्याद वापर न करता, बागायत क्षेत्रामध्ये ठिबक, तुषार,

मायक्रोस्प्रिकलर पद्धतीचा वापर वाढवावा.

मृद व जलसंधारणाची उपाययोजना लोकसहभागातून कोरडवाहू भागात

शासनाच्या मदतीने वाढविणे गरजेचे आहे, कारण पावसाचा प्रत्येक थेंब

हा जमिनीत मुरविला गेला पाहिजे.

शेततळी तयार करून संरक्षित पाण्याचा उपयोग करावा.

बागायत क्षेत्रात दोन ते तीन वर्षातून एकदा तरी हिरवळीची पिके म्हणून धंचा किंवा ताग गाड़ला गेला पाहिजे.

क्षारपड जमिनीचे क्षेत्र सुधारविण्यासाठी एकात्मिक पद्धतीने पाणलोट क्षेत्रात जिप्सम शेणखतात मिसळून जमिनीत टाकावे. जादा पाण्याचा

पश्चिम महाराष्ट्रातील हलक्या जमिनीचे क्षेत्र ठिबक सिंचनावर आणून कोरडवाहू फळबाग लागवड करणे गरजेचे आहे.

जास्त पाणी कमी क्षेत्रावर देण्याऐवजी कमी पाणी जास्त क्षेत्रावर विभागून दिल्यास जमिनी खराब होणार नाहीत तसेच उत्पादनात वाढ होईल आणि सामाजिक समतोल राखला जाईल.

शेतक-यांनी आपल्याकडील असलेल्या जमिनीची 'आरोग्यपत्रिका' तयार करून त्यानुसार जमीन सुधारणा व पीक पद्धतीचे नियोजन करावे.

शेतातील उरलेले पीक अवशेष न जाळता त्यांचा आच्छादन म्हणून उपयोग करावा किंवा बारीक तुकडे करून जमिनीत मिसळावे, म्हणजे संख्या वाढेल. अशा प्रकारे भविष्यात शेतकरीबंधुनी जमीन आरोग्य व सुपीकता सुधारण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे. यामध्ये माती परिक्षणावर आधारित रासायनिक खतांचा वापर, जिवाणू खते, भरखते व

हिरवळीच्या खतांचा वापर केल्यास रासायनिक खतांची गरज काही प्रमाणात कमी होऊन अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढेल. पर्यायाने जमीन, हवा, पाणी या नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास होणार नाही .

HOPE IT HELPS

MARK ME AS BRAINLIST

Similar questions