English, asked by nichu5643, 10 months ago

जनसेवा हीच खरी ईश्र्वरसेवा ask answer

Answers

Answered by CatQueen2004
1

clear your ques buddy ....

do follow ...

and mark me the brainliest

Answered by Anonymous
9

बरोबर प्रश्न : जनसेवा हीच खरी ईश्र्वरसेवा याविषयी निबंध लिहा

उत्तर :

⠀⠀⠀⠀⠀⠀जनसेवा हीच खरी ईश्र्वरसेवा

शेकडो श्रोते गाडगेबाबांची आतुरतेने वाट पाहत होते. आज त्यांना बाबांचं दर्शन घडणार होते. त्यांची अमृतवाणी ऐकायला मिळणार होती ! पण बाबा अजून कीर्तनाच्या जागी पोहोचले नव्हते. तेवढ्यात कोणाला तरी कळले की, बाबा नदीकिनाऱ्यापर्यंत आले आहेत. तत्क्षणी कित्येकांनी नदीकडे धाव घेतली. बाबा तिथे होतेच. सगळ्यांनी हात जोडून लीनपणे बाबांना विनवणी केली, "बाबा, भजनाची वेळ झाली. येताय ना?""अरे बाबांनो, मग हे काय चाललंय? मी भजनच करतोय ! ही देवाचीच पूजा चाललीय !" सारे विस्मयाने बघतच राहिले. कारण तेव्हा बाबा एका कुष्ठरोग्याला अंघोळ घालत होते !

त्या दिवशीच्या कीर्तनात बाबांनी निरूपणासाठी हाच विषय घेतला. त्यांच्या मते, सर्व माणसे ईश्वराचीच लेकरे आहेत. ती ईश्वराचीच विविध रूपे आहेत. या माणसांची सेवा हीच प्रत्यक्ष ईश्वराची सेवा होय. देवाची भक्ती करायची असेल, त्याची सेवा करायची असेल, तर देवळात जायची गरज नाही, तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याची गरज नाही. प्रत्येक माणसाचा आत्मा हाच परमेश्वर आहे. आपण माणसातच ईश्वर शोधला पाहिजे. माणसाचीच सेवा केली पाहिजे.

दुर्दैवाने काही जणांना धडधाकट निरोगी शरीर लाभत नाही. काहीजण जन्मतःच अपंग असतात. काहीजणांना वेगवेगळ्या रोगांनी ग्रासलेले असते. ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे शरीर साथ देत नसते. या सगळ्यांना साधे माणसासारखे जीवन जगणे कठीण बनते. शरीर दुबळे असल्याचे दुःख असतेच, पण समाजात लोक उपेक्षा व अवहेलनाही करतात. याचेही दुःख असतेच. यामुळे या सर्वांचे जीवन दुःखाने व्यापलेले असते. यात खरे तर या दुर्दैवी माणसांचा काहीही दोष नसतो. त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नसतो. निसर्गानेच हे दुःख त्यांच्यावर लादलेले असते. अशा लोकांना आधार देणे, त्यांचे जीवन सुसह्य करणे आवश्यक असते. म्हणून इतरांनी या अशा लोकांची सेवा केली पाहिजे. त्यांना मदत केली पाहिजे. ते आनंदी बनले. तर देवालाच आनंदी केल्यासारखे होईल. ती ईश्वरसेवाच ठरेल. समाजात काहीजणांना जातिपातीच्या कारणाने कमी दर्जाचे मानले जाते. त्यांना साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा खूप झगडावे लागते. त्यांना समाजात मानाने वागवले जात नाही. गरीब व अनाथ यांचीही अशीच स्थिती असते. त्यांनाही आधाराची गरज असते. त्यांना आधार दिला. त्यांची सेवा केली तर तीही ईश्वरसेवाच ठरेल.

Similar questions