जपान या देशाची सामाजिक व राजकीय प्रगती इन मराठी
Answers
Answer:
जपान : औद्योगिक दृष्ट्या जगातील अत्यंत पुढारलेल्या देशांपैकी एक. क्षेत्रफळ ३,७७,३८९ चौ.कि.मी. लोकसंख्या (ओकिनावासह) १०,८४,३०,००० (१९७३). विस्तार सु. २४° उ. ते ४६° उ. व १२३° पू. ते १४७०पू. राजधानी टोकिओ. आशिया खंडाच्या पूर्व किनाऱ्यालगत, तैवान बेट आणि कूरील बेटे यांच्या दरम्यान लहानमोठ्या बेटाच्या तीन चंद्रकोरी मालिका तयार झाल्या आहेत. यांनाच पुष्कळ वेळा ‘तोरण बेटे’ म्हणून संबोधण्यात येते. या तोरण बेटांत चार मोठ्या व इतर ३,४०० बेटांचा समावेश होतो. ही सर्व बेटे मिळूनच जपान देश झाला आहे. या देशातील चार मुख्य बेटांची नावे दक्षिणेकडून उत्तरेकडे अनुक्रमे क्यूशू (४१,९७१ चौ. कि.मी.), शिकोकू (१८,७६४), होन्शू (२,२३,३७७) आणि होक्काइडो (७८,५१०) अशी आहेत. या देशाच्या पश्चिमेस जपानी समुद्र असून त्याची जास्तीत जास्त पूर्व-पश्चिम रुंदी ८८५ किमी. भरते. तो काही जागी ३,००० मी. पर्यंत खोल आहे. या देशाचे नैर्ऋत्य टोक म्हणजे क्यूशू बेटाचा उत्तर किनारा, आशिया खंडाच्या मुख्य भूमीपासून १८७ किमी. अंतरावर असून ते मुख्य भूमीपासून त्सुशिमा आणि कोरिया या सामुद्रधुन्यांमुळे विलग झाले आहे. या देशाच्या दक्षिणेकडे पूर्व चिनी समुद्र आणि पूर्वेस उत्तर पॅसिफिक महासागर आहे. उत्तरेस रशियन मुख्य भूमीपासून होक्काइडो हे बेट २८२ किमी. अंतरावर असून ते रशियाच्याच सॅकालीन व कूरील बेटांच्या दक्षिण टोकांपासून अनुक्रमे ४० किमी. व १८ किमी. अंतरावर आहे. दुसरे महायुद्ध चालू असताना व तत्पूर्वी जपानने मँचुरीया, कोरिया व आग्नेय आशियाचा बराचसा भाग आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. पण त्या युद्धात शेवटी या देशास पराभव पतकरावा लागल्याने त्या सर्वांवरील ताबा जपानला सोडून द्यावा लागला. १९६८ मध्ये बोनिन व्हाल्केनो बेटे आणि १९७२ मध्ये रिऊक्यू बेटे (२,३२५ चौ.किमी.) जपानला परत मिळाली.
hope it helps
plz mark me as a brainliest