India Languages, asked by sushithnunemunthala, 1 year ago

Jar bhalapan नसते तर essay in marathi

Answers

Answered by kamlakarlandge
5

Answer बालपण नसते तर आपण नसतोच...

Explanation:

Answered by Hansika4871
15

*Jar lahapan naste tar essay in marathi*

मित्रानो बालपण नसते तर!!! हा विषय म्हटलं तर साधा आहे पण सोपा नाही आहे.याला बरीच कारणं आहे. माणसाचा जन्मच आईच्या उदरातून होतो. म्हणजे लहान मूल जन्माला येतं. हे लहान मुल मग वेगवेगळ्या अवस्थेत मोठं होत वयाची एकेक वर्ष गाठत त्याला परिपक्वता येते.आणि अठराव्या वर्षानंतर मग तो माणूस या व्याख्येत मोडतो.

बालपण नसतं तर?हा विषय घेतला तर बऱ्याच गोष्टी पुढे होऊन माणसाला कठीण होईल.अचानक काही माणूस शिकून मोठा व्हायचा नाही.त्याला शिकण्यासाठी वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांची गरज असते.आणि ही गरज लहानपणापासून आपल्याला आपले आई-वडील भावंड,नातेवाईक,घर-दार आपला समाज आपले शिक्षक आपल्याला संस्काराच्या,धड्यांच्या,व्यवहाराच्या,नातेसंबंधांच्या माध्यमातून शिकवत असतात.परंतु हे काही उपलब्ध झालं नाही आणि माणूस मोठा होऊनच जन्माला आला कठीण होऊन जाईल कशाचा कशाला ताळमेळ राहायचा नाही सगळेच माणसं स्वतःला शहाणे सुधारलेले समजतील एकमेकांच्या भावना समजून घेणार नाहीत मी आणि माझं मतच खरं यावरच ठाम राहतील.

सर्वत्र मनमानी होईल आणि एकूणच व्यवहाराचं, जगण्याचं ताळतंत्र बिघडेल कारण प्रत्येकाला जन्म घेतानाच मोठेपणाची भावना निर्माण झालेली असेल.

लहानपण महत्वाच कारण थोरामोठ्यांनी म्हटलेलेच आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण सर्वार्थानं आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे त्याच्यातूनच आपण शिकत जातो आणि मोठे होतो म्हणून बालपण नसते तर हा विषयही मनाला शिवत नाही पण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही शून्यातून होते आणि मग ती वाढत जाते तसाच मानवाचं ही आहे.

Similar questions