Art, asked by naveenkolli5634, 1 year ago

jar pariksha nasti tar marathi

Answers

Answered by prashanth1551
6
परीक्षा नसत्या तर?


नुसता विचारही किती सुखावह आहे.. “परीक्षा नसत्या तर??”. शालेय जिवनात विद्यार्थी कित्तेक परीक्षांना सामोरे जात असतो. चाचणी परीक्षा, सहामही परीक्षा, वार्षीक परीक्षा ह्या तर नेहमीच्या झाल्याच पण त्याचबरोबर तोंडी परीक्षा, पाठांतर परीक्षा, विज्ञान प्रयोगाच्या परीक्षा, हस्तव्यवसाय, चित्रकला, पि.टी. एक ना दोन असंख्य परीक्षांचा भडीमार चालु असतो वर्षभर. शिकतो म्हणुन परीक्षा असतात का परीक्षा आहेत म्हणुन शिकतो असा प्रश्न मनामध्ये तरळुन जातो.
परीक्षांचे वेळापत्रक लागले आणि जसजसे परीक्षांचे दिवस जवळ यायला लागले की सारं वातावरणच बदलुन जाते. विषेशतः वार्षीक परीक्षा. घरातला दुरदर्शन बघणे तसेही अशक्यच असते, ह्या काळात तर तो दुरदर्शनचा आवाजही ऐकु येत नाही. खेळाची मैदाने ओस पडलेली असतात. बाहेर पानगळतीचा हृतु चालु झालेला असतो. कोपऱ्या कोपऱ्यावर उसाची गुऱ्हाळ असतात. शाळेत वाचनलयातुन एखादे पुस्तक आणावे म्हणुन चक्कर मारावी तर शाळाही ओसच असतात. एखादा दुसरा मित्र भेटतो पण त्याच्याही चेहऱ्यावर परीक्षांचे ओझे दिसत असतेच.

Similar questions