जर ACTAT=11 तर ACT म्हणजे कोणती संख्या असेल?
Answers
महत्त्वाचे मुद्दे -
(1) समसंख्या- सम संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी कोणताही अंक असतो.
(2) विषम संख्या- विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कोणताही एक अंक असतो.
(3) मूळ संख्या व संयुक्त संख्या
* 1 ते 100 संख्यामध्ये 25 मूळ संख्या आहेत.
* 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे.
* 2 सोडून बाकीच्या 24 मूळसंख्या या विषममूळ संख्या आहेत.
* 1 ते 100 मध्ये 74 संयुक्त संख्या आहेत.
* 1 ही संख्या मूळ किंवा संयुक्त संख्या नाही.
संख्यागट मूळसंख्या संख्यागट मूळसंख्या
1 ते 10 2, 3, 5, 7 51 ते 60 53, 59
11 ते 20 11, 13, 17, 19 61 ते 70 61, 67
21 ते 30 23, 29 71 ते 80 71, 73, 79
31 ते 40 31, 37 81 ते 90 83, 89
41 ते 50 41, 43, 47 91 ते 100 97
* एकअंकी मूळसंख्या- 2, 3, 5, 7 अशा 4 आहेत.
* दोनअंकी मूळसंख्या 21 आहेत.
* जोडमूळ संख्या - 1 ते 100 च्या दरम्यान जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत.
(1) 3, 5 (2) 5, 7 (3) 11, 13 (4) 17, 19 (5) 29, 31 (6) 41, 43 (7) 59, 61 (8) 71, 73
* दोन मूळसंख्यांत 2 चा फरक असतो. त्या मूळसंख्या जोडमूळ किंवा जुळ्या मूळसंख्या असतात.
सहमूळसंख्या- कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही सममूळ संख्यांची जोडी असते.
उदा. 7, 8, 11, 12, 23, 24, 25, 26 इ.