जर मी फुलपाखरु असतो तर मराठी निबंध
Answers
मी फुलपांखरू झाले तर !
मी आणि माझी बहिण आमच्या घरा जवळ असलेल्या बागे मदे गेलो होतो. माझ्या बहिणीला फोटो काढण्याची खूप हउस त्या मुळे ती तर बागे मदे फोटो काढायला एकदम रमून गेली. बागेत सुंदर फुले होती, आणि खूप चांगले वातावरण होते पण मी मात्र कंटाळून तिथेच एका जागेत बसून राहिला होता.
जेव्हा आम्ही आमच्या घरी आले तेव्हा माझ्या बहिणीने घरी बागे मधे काढलेले फोटो सगळ्यांना दाखवले त्या मधे तिने एक सुंदर फुलपांखरूचा फोटो काढला होता. फुलपांखरूचा फोटो बगून सगळे त्या फुलपांखरू बदल बोलत होते, तेव्हा माझ्या मनात कल्पना आली "मी फुलपांखरू झालो तर" आणि मग माझ्या मनात कल्पनेचा गोंधळ उडायला लागला.
फुलपांखरू झाल्यावर मला किती सुंदर पंख येतील आणि माझे हे रंगीत पंखावरच्या सुंदर आकृत्या पाहुन लोक एक सारखे माझे कौतुक करतील, आणि माझ्या बाहीणी सारखे फोटो काढयला माझ्या मागेच असतील.
मी माझी पंख पसरून हवे त्या फुलावर जाऊन बसेन हवे तिथल्या जागेवर जाईल मला अडवणारे कोन्ही नसेल, नाही तर कुठेही जायच असेल तर घरी विचारवे लागते आणि पाठवले तरी किती गर्दी मदे प्रवास करावा लागतो पण मी फुलपांखरू झालो तर कोणाला हि विचारवे लागणार नाही आणि बाहेर फिरताना मला गर्दी हि लागणार नाही.
आता मला शाळेचा किती अभ्यास असतो, शाळा झाली कि टूशनला जावे लागते घरी आला कि दोन्ही ठिकाणचा गृहपाठ करण्यातच वेळ जातो मला धड खेळायला सुद्धा मिळत नाही. पण जर मी फुलपांखरू झलो तर मला अभ्यास हि करावा लागणार नाही शाळे आणि टूशनची गोष्टच उरणार नाही, आपले पंख उगडायचे आणि ह्या फुलावरून त्या फुलावर पूर्ण दिवस खेळत राहायचे.
हव तेव्हा पोटभरून खायच आणि कंटाळ आला कि पाहिजे तितका वेळ मस्त आराम करायचा. मी फुलपांखरू झालो तर आयुष्यामदे किती सुख येईल नाही का ?.
समाप्त.