जर मी पंतप्रधान झालो तर.... निबंध लेखन
Answers
Answer:
Explanation:
भारतीय राजकारणात मुख्यमंत्री पद भूषवलेल्या अनेकांना पंतप्रधान पदाची स्वप्ने पडतात. ही पण स्वप्ने सहसा राष्ट्रीय पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना पडतात. पण, प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनाही आघाडयांच्या मदतीने केंद्रात सत्ता स्थापन करण्याची आणि पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत.
भारतीय राजकारणात मुख्यमंत्री पद भूषवलेल्या अनेकांना पंतप्रधान पदाची स्वप्ने पडतात. ही पण स्वप्ने सहसा राष्ट्रीय पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना पडतात. पण, प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनाही आघाडयांच्या मदतीने केंद्रात सत्ता स्थापन करण्याची आणि पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. स्वत:ची राष्ट्रीय प्रतिमा नसताना, पक्षाला राष्ट्रीय चेहरा-मोहरा नसताना मलाच पंतप्रधान करा, असा हट्टहास अलीकडे काही प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी लावलेला दिसतो. यात मायावती आघाडीवर आहेत. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी पंतप्रधान झाले तर काय करणार आहोत, याचा आराखडाच रविवारी जाहीर केला. याचा अर्थ मायावती यांना देशाच्या पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडत आहेत, असा होतो. एक वेळ अशी होती की, लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय चित्र कसे असेल, याविषयी कमालीचा गोंधळ होता. केंद्रात कोणाची सत्ता येईल, याविषयी कोणी अंदाज बांधूच शकत नव्हते. त्यामुळे शरद पवार यांच्यापासून ते मुलायमसिंह यादव यांच्यापर्यंतकोणीही २५-२० खासदारांच्या जोरावर पंतप्रधान होऊ शकेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. अशा अनपेक्षितपणे पंतप्रधान होण्याची संभावना असलेल्यांमध्ये मायावती, जयललिता यांचाही समावेश होता. सध्याचे राजकारण हे आघाडीचे राजकारण आहे आणि आघाडीच्या राजकारणात काहीही घडू शकते. मायावती पंतप्रधान होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता त्या काळात त्यांच्या डोक्यात गेलेली पंतप्रधान पदाची हवा अजूनही निघालेली नाही. म्हणूनच रविवारच्या लखनौमधील ब्राह्मण भाईचारा मेळाव्यात आपण आता जणू पंतप्रधान होणारच आहोत, अशा आविर्भावात त्यांनी राबवणार असलेल्या योजनांचा आराखडाच जाहीर केला. त्यांचे सारे राजकारण जातींशी निगडित व जातींचा हिशोब घालूनच केले जाते. त्यांच्या त्या कथित आराखडयात काही विशिष्ट जातींना आरक्षणाचे लाभ देण्याच्या आश्वासनांचा समावेश होता. सध्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये आरक्षणाचे अस्त्र वेगवेगळ्या पद्धतीने वापरले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मायावती यांनी मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे घोषित केले. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीत राजकीय पक्षांना अविवेकी, अतिरेकी आणि खोटी, मोफत योजनांची गाजरे दाखवता येणार नाही, असे स्पष्ट करून झापले होते. आश्वासनांच्या संदर्भात काही तरी एक आचारसंहिता असावी, असेही न्यायालयाने सूचित केले. मात्र, मायावतींना याचा विसर पडलेला दिसतो. मी पंतप्रधान झाले तर .. अशा प्रकारे जर तरच्या गोष्टी करून मायावती आश्वासनांचा फक्त पाऊस पाडत आहेत. त्यांची ही आश्वासने लोक किती गांभीर्याने घेतात, हे उत्तर प्रदेशच्या लोकांनी त्यांना सत्तेबाहेर बसवून या आधीच दाखवून दिले आहे.
I hope it is helpful to you
Mark as brainlist
Answer: