जशा तसे कथा लेखन
plz give me story please it is urgent
Answers
Answer:
जशा तसे कथा लेखन
एकदा एक माणूस आपल्या गाढवाच्या पाठीवर खाण्याच्या पदार्थांचे ओझे लादून त्याच्यावर बसून आपल्या कुत्र्यासह बाहेरगावी चालला होता. असेच बऱ्याच वेळ चालल्यानंतर तो माणूस थकला व विश्रांती घेण्यासाठी एका झाडाच्या सावालीत झोपी गेला. तो झोपला असताना त्याचे गाढव व कुत्रा हे दोघेही शेजारी असलेल्या झाडाखाली उभे होते.
काही वेळ गेल्यानंतर कुत्रा अतिशय नम्रतेने गाढवाला म्हणाला, “अहो गाढवदादा, मला फार भूक लागली आहे. तुमच्या पाठीवरील सामानातील एक दोन भाकऱ्या मला देता का?”
तेव्हा गाढव त्याला म्हणाले, “हो, मालक उठले की मी त्यांना विचारीन आणि ते हो म्हणाले तर मी तुला नक्कीच भाकरी देईन.”
गाढवाचे ते बोलणे ऐकून कुत्र्याला राग आला व तो म्हणाला, “गाढवदादा, तुमची ही स्वामीनिष्ठा काही कामाची नाही, कारण झोपेच्या बाबतीत आपला मालक कुंभकर्ण आहे आणि तो लवकर उठेल असे मला वाटत नाही. मी काय तोपर्यंत भुकेने असाच तळमळत राहू का?”
कुत्र्याचे ते विनवणीचे बोलणे ऐकून देखील गाढव म्हणाले, “नाही ते शक्य नाही. मालक उठले की, त्यांना विचारीन आणि ते ‘हो’ म्हणाले तरच तुला मी भाकरी देईन. तोपर्यंत मात्र माझ्या पाठीवरील ओझ्यातील पदार्थांमधील एक कण देखील मी तुला देणार नाही.”
गाढव कुत्र्याला असे सांगत असतानाच तेथे एक आडदांड असा लांडगा आला व त्याने आपल्या धारदार अशा नखांनी त्या गाढवाला ओरबाडायला सुरूवात केली, तेव्हा अतिशय काकुळतीला येऊन गाढव कुत्र्याला म्हणाले, “मोती, या लांडग्यापासून तू माझे रक्षण कर रे!”
तेव्हा कुत्रा गाढवाला म्हणाला, “गाढवदादा, काय करणार! मी देखील तुमच्यासारखाच आपल्या मालकाच्या आज्ञेप्रमाणे वागणारा आहे म्हणून जेव्हा मालक उठतील तेव्हा मी त्यांना गाढवदादाचे रक्षण करू का? असे विचारेल आणि ते हो म्हणाले तर मी तुझे रक्षण नक्कीच करेन.”
कुत्र्याचे ते बोलणे संपेपर्यंत त्या लांडग्याने गाढवाच्या नरडीचा घोट घेतला आणि मरता मरता गाढव मनात म्हणाले, “आता कुत्र्याने माझे रक्षण केल नाही म्हणून मी त्याला दोष कसा देणार? कारण ‘जशास तसे’ या न्यायाप्रमाणे तो माझ्याशी वागला आहे म्हणूनच या लांडग्याच्या समोर बळी जाण्याची वेळ माझ्यावर आली.”
जशास तसे वागायचे असेल तरी ते वेळप्रसंग बघून वागावयास हवे.
Hiiiiiiiiiiiiiiiiiiiii