India Languages, asked by praz1, 1 year ago

झाडे बोलू लागली तर निबंध

Answers

Answered by varshadakhle
80
ME Kahi points deu shakte ya topic vr..


1. zade bolu lagli tr 1st te tyanche problem sangtil.

2. tyana kay hav ahi te sangtil.

3. ajun aaplya help baddl boltil. .
Answered by halamadrid
117

■■झाड बोलू लागले तर!■■

एकदा मी माझ्या घरासमोर असलेल्या बागेत हिंडत होती. तेव्हा मला एक मोठे झाड दिसले, माझ्या मनात सहज विचार आला,जर हे झाड बोलू लागले तर!

तर ते म्हणेल, "मुली कशी आहेस? मी तुझाच मित्र बोलत आहे. तुझ्या पणजोबांनी या ठिकाणी मला वाढवले. मला खूप संभाळले.आता मी खूप मोठा झालो आहे.

माझ्या अंगावर पक्षी बसतात, तुम्ही माझ्या सावलीत बसतात. मी तुम्हाला फळे व फुले देतो. माझ्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन मिळतो,माझ्यामुळे वातवरण थंड राहते,पाऊस पडतो, हवा शुद्ध राहते.

मी तुमची इतकी मदत करतो,पण तरीही तुमच्यातले काही लोक आमच्याशी फार वाईट वागता.आम्हाला तुम्ही तोडता. जर आम्ही नसलो,तर तुमचे खूप नुकसान होईल.

तुम्हाला शुद्ध हवा मिळणार नाही. जमीन कसदार राहणार नाही. पाऊस नाही पडणार. प्रदूषण वाढेल. म्हणून, आमची काळजी घेत जा". एवढ्यातच माझ्या अजोबांनी मला हाक मारली,मी पटकन माझ्या विचारांच्या दुनियेतून बाहेर पडले.

Similar questions