झाडाचे आत्मकथा
plz give ans
Answers
Answer:
ajshffejjshehtgwgdhhsysggsv
Explanation:
एका सायंकाळी मी फेरफटका मारायला घराबहेर पडलो. एका झाडाच्या बाजूने पुढे जात असताना माझ्या कानावर हाक मारल्याचा आवाज आला मी थांबलो; आणि पाहतो तर काय ? जणु झाडच माझाशी बोलत होते.
अरे, मित्रा ! तू माझ्या या परिस्थितीवर दोन अश्रू नाही वाहीलेस तरी चालेल, पण माझी गोष्ट ऐकून जा . आज मला माझ्याबद्दल काही सांगण्याची इच्छा झाली आहे.
लहान असताना मला खूप कठीण समस्यांचा सामना करावा लागला होता. कधी हिवाळ्यात पडणारी थंडी, कधी उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे माझ्या शरीराची लाहीलाही व्हायची, तर कधी पावसाळ्यात होणाऱ्या जोरदार पावसाचा सामना केला. पण रोज सकाळी सूर्यकिरणांचे मनोहर दृश्य पाहून माझे जीवन नव्याने खुलून निघत असे. संध्या माझ्यावर तिची स्वर्णिम सुंदरता पसरत असे. कसे हसत-खेळात निघून गेले ते बालपणातील दिवस.
आज मी फक्त एका खोडाच्या रूपात अस्तित्वात राहिलो आहे. पण तरुणपणातले ते दिवस, तो आनंद, तो रंगीबेरंगी निसर्ग आजही माझ्या डोळ्यांत साठवून ठेवला आहे. त्या वेळी माझ्या चारही बाजुला हिरवळ पसरलेली असायची, या साऱ्या धरतीने जणू हिरवी मखमली शालच पांघरलेली असायची, किती मनमोहक दृश्य असायचे त्या वेळेचे. त्या वेळी विविध प्रकारचे पक्षी दूर - दूरहून येऊन माझ्या फांद्यांवर बसायचे. त्या छोट्या - छोट्या चिमण्यांना मी कधीही विसरू शकत नाही, ज्या माझ्या फांद्यांवर बसून चिवचिवाट करत असायच्या . माझ्या अंगाखांद्यावर खेळत असत. मला हे ही आठवते की, एका कोकिळीने माझ्या घनदाट फांदीवर तिचे घरटे बनवले होते. त्या कोकिळेची छोटी छोटी पिल्ले माझी फळे खाऊन मौज - मजेत त्यांचे जीवन जगत होते. त्यांचा तो आनंद बघून मी आनंदित रहायचो. त्यामुळे कधी वेळ निघून जायचा काही समजायचे नाही.