झाडाचे महत्त्व निबंध लेखन
Answers
झाडांचे महत्त्व
जगातील लोकांमधे वने आणि वनापासून मानवाला मिळणारे विविध फायदे याबाबत जागृती येण्यासाठी दरवर्षी २१ मार्च हा दिवस जागतिक वनदिन म्हणून साजरा केला जातो. युरोपियन कृषी परिषदेच्या २३ व्या आमसभेत सन १९७१ साली या संकल्पनेचा उदय झाला. केवळ वृक्षसंपदा असाच वनाचा अर्थ न घेता वृक्षामुळे वातावरणाचे संरक्षण होते ते केले जावे, अशी अपेक्षा आहे. वृक्षांच्या आणि प्राण्यांच्या अनेक प्रजाती वनात वास्तव्यास असतात. विविध कृमी, कीटक, जीवाणूंचे वास्तव्य वनातील मातीत असते. पोषणदृष्ट्या ही माती पौष्टिक मानली जाते म्हणूनच दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात होणारी वृक्षतोड चिंतेचा विषय आहे. वृक्षतोड करून मानवाच्या वसाहती निर्माण करण्यासाठी वनांचा मोठ्या प्रमाणावर र्हास होत आहे. म्हणूनच वन संरक्षणाकरता प्रत्येकाने वैयक्तीकरीत्या भाग घेण्याची गरज आहे. वनसंरक्षण खात्याच्या नियमाप्रमाणे प्रत्येकी एक वृक्षाची तोड केल्यास त्या जागी १० झाडांची लागवड केली पाहिजे. दिवसेंदिवस होणार्या जंगल कटाईमुळे मातीची धूप, वृक्षांची कमतरता, पावसाचे कमी होत जाणारे प्रमाण, वृक्षाअभावी येणारे पूर अशा समस्या जगात जागोजागी भेडसावत आहेत. सन १९५२ साली भारताने आपले वनविषयक धोरण जाहीर केले. शास्त्रीयदृष्ट्या ३३ टक्के जमीन वनाखाली असणे आवश्यक आहे, याची जाणीव ठेवून भारत सरकारने ‘वन महोत्सव’ सुरू केला. पण याबाबत पाहिजे तेवढी जनजागृती अजूनही झाली नाही, असेच म्हणावे लागेल.
पूर्वीच्या काळी आदिवासी बांधव निसर्गालाच देव मानत असत, त्याचे संवर्धन जतन करणारा समाज हा नांगरणी न करताही पीक काढत असे. तो वनातील झाडांची फांदी कधीही तोडत नसे. कारण झाडांनाही जीव असतो हे तो जाणत होता. तो जंगलाचा मित्र होता. त्याला जंगलची भाषा समजत होती. पण तो कधीही जमीनदार झाला नाही. आज शासन वन आणि वनवासीसाठी विविध योजना राबवत आहे. जंगल तुमचे, ती वाढवण्याची जबाबदारी तुमची आणि त्यातून मिळणारी संपत्तीही तुमचीच. जंगलाला आणि शेजारच्या आदिवासींना जगवणारी योजना राज्य शासनाने हाती घेतली आहे. महाराष्ट्र राज्याच्या वन विषयक धोरणाचा अभ्यास केला तर असे समजले की महाराष्ट्रात वनाखालील क्षेत्र २०.१० टक्के आहे. वनस्पतीमध्ये झाडेझुडपे, वेली, गवत इत्यादींचा समावेश होतो. या वनस्पतीची वाढ हवामान, पाऊस, जमिनीचा उंच-सखलपणा या भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असते. महाराष्ट्र राज्यात भौगोलिक परिस्थितीत भिन्नता आढळते, म्हणूनच वनस्पतीत सुद्धा भिन्नता आहे. सदाहरित वने, पानझडी वने आणि काटेरी झुडपांचे वने असे वनांचे तीन प्रकार महाराष्ट्रात दिसून येतात.सदाहरित वनांची झाडे हिरवीगार दिसतात. आपल्या सह्याद्रीचा उंच भाग आणि पश्चिम उतार तसेच दक्षिण कोकण भाग या जास्त पावसाच्या प्रदेशात ही वने आहेत. पानझडी वनातील झाडांची पाने उन्हाळ्याच्या सुरवातीलाच गळतात, पावसाळ्यापूर्वी येथील झाडांना पालवी फुटते. महाराष्ट्र राज्यात सह्याद्रीचा पूर्व उतार मेळघाट व सातपुडा सातमाळा व अजिंठा या मध्यम पावसाच्या भागात ही वने आढळतात. काटेरी झुडपांच्या वनात कमी उंचीची झाडेझुडपे आढळतात, नापीक जमीन व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात काटेरी झुडपे आढळतात. मध्य महाराष्ट्रात पठारी भागात ही वने आहेत.
महाराष्ट्रात याशिवाय किनारपट्टीच्या खार्या जमिनीत विशिष्ट पाणथळ वनस्पती आढळतात. डोंगर उतारावर व माळरानात गवत उगवते. हवेतील गारवा टिकवण्यासाठी, हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी औषधी वनस्पतीची उपलब्धता, फर्निचर व शेतीच्या अवजारासाठी लाकूड मिळवणे फळे-भाज्या-मध इत्यादी खाद्यपदार्थाची उपलब्धता इ.प्रकारे वनांचा उपयोग केला जातो. या वनाचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सामाजिक वनीकरण विभागाची निर्मिती केली आहे. या विभागातर्फे रस्ते, लोहमार्ग, कालवे, शिक्षणसंस्था शासकीय कार्यालये इ. ठिकाणी वृक्ष लागवड केली जाते.
जागतिक वनदिनानिमित्त प्रत्येकाने किमान एक झाड लावून वनदिन साजरा करावा असा आदेश महाराष्ट्र सरकारने दिला.आणि तो आपण सर्वांनी अमलात आणला पाहिजे. दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात होणारी वृक्षतोड हा चिंतेचा विषय आहे. वनखात्याच्या नियमाप्रमाणे १ झाड तोडल्यास १० झाडे लावण्याची गरज आहे. हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण टिकवण्यासाठी, गारवा टिकवण्यासाठी औषधी वनस्पतीची उपलब्धता, शेतीची अवजारे इ. साठी वनांची आवश्यकता आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने सामाजिक वनीकरणाची निर्मिती केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शासनाने विविध वन रक्षकांची नेमणूक करून पर्यावरणाचे सरक्षण करण्यास सुरुवात केली आहे. त्याच प्रमाणे शासनाने ‘झाडे लावा झाडे जगवा’ अशा प्रकारचे विविध उपक्रम चालू केले. व त्याच प्रमाणे त्यातून रोजगारही उपलब्ध करून दिला. जागतिक वनदिनानिमित्त प्रत्येकाने किमान एक झाड लावून वनदिन साजरा करावा असा आदेश महाराष्ट्र सरकारने दिला.आणि तो आपण सर्वांनी अमलात आणला पाहिजे. दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात होणारी वृक्षतोड हा चिंतेचा विषय आहे. वनखात्याच्या नियमाप्रमाणे १ झाड तोडल्यास १० झाडे लावण्याची गरज आहे.