झाडा लावा झाडे जगावा marathi dialogue
Answers
as it is a dialogue the trees may be related to childrens.
तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून म्हटले आहे, "वृक्षवल्ली आम्हाची रे सोयरे". म्हणजे झाडे, झुडपे, वेल्या हे सगरे आमचे नातेवाईक आहेत. हे अगदी बरोबर आहे. प्राणिमात्राचे एकमेव मित्र म्हणजे पर्यावरण आणि त्या पर्यावरणाला संतुलित करण्याचे काम वृक्षे करत असतात.
आज वृक्षतोडी मुळे समाजावर केवढे दुष्परिणाम ओढवले आहे ते दिसतच आहे. कुठे कुठे पावसाचा प्रमाण खूपच जास्त आणि कुठे कुठे पूर्ण दुष्काळाची स्थिती, हे सगळे वृक्षतोडीचा कारणास्तव घडलेले परिणाम आहे. झाडे कापून आपण आपलेच शत्रू का बनत आहोत?
जर आपल्याला आपल्या नंतर येणाऱ्या पिढीचा भविष्य सुखी बघायचं असेल तर आपल्याला झाडे लावा, झाडे जगवा हे ब्रीदवाक्य अंगिकारावेच लागेल. जर आम्ही झाडे लावली नाहीत आणि झाडे जगवली नाही तर येणाऱ्या काही वर्षातच, आम्हाला पिण्याचा पाण्यासारख्या महासंकटाला सामोरे जावे लागेल. येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला दुष्काळासारख्या भीषण संकटाचे दर्शन होईल, ज्याचे समाधान जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही.
म्हणून झाडे लावा आणि झाडे जगवा जेणेकरून आमच्या पर्यावरणाचे भार समतल राहील जेणेकरून आम्ही आणि आमच्या येणाऱ्या पिढीला आपण वारस्यात सुखी आणि समृद्ध जीवन देऊ शकू.