India Languages, asked by rajeshmallya28, 1 year ago

झाडे लावा,झाडे जगवा,पर्यावरण वाचवा. I want 2 minute speech on this above topic. Answer only in Marathi.​

Answers

Answered by Anonymous
5

Answer:

एका कार्यक्रमाचा समारोप चालू होता. वक्ता आमंत्रित पाहुण्यांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत होता आणि आभार मानताना पुष्पगुच्छाऐवजी प्रत्येकाच्या हाती एकेक रोप देत होता. अतिशय आवडली मला ही कल्पना. आज एवढ्या घरातून नक्की झाडे लावली जातील आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून ती जोपासली जातील. आजच्या काळाची ती एक नितांत गरज आहे. माणसाच्या हातून नकळत फार मोठा गुन्हा घडला आहे. माणसांनी विकासाच्या नावाखाली अमर्याद जंगलतोड केली, वनांचा विध्वंस केला. जंगलांवर कुणाचा हक्क? कुणाची मालकी? कुणाचीही नाही; म्हणजे सर्वांचीच. शहरे फुगत चालली तसतशा मोठ्या इमारतींची आवश्यकता निर्माण झाली. वाहनांची सोय करण्यासाठी मोठमोठे रस्ते आवश्यक झाले. मग वाटेत येणारी झाडे; झाडे कसली मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले. घरे उभारण्यासाठी लाकूड, घरे सजवण्यासाठी लाकूड... पुस्तके, ग्रंथ, कचेयांतील कामांसाठी कागद; त्यासाठी पुन्हा लाकूड. वर्षानुवर्षे डोळ्यांवर पट्टीfake बांधून आपण झाडे तोडत राहिलो. खेडेगावातील गरजा वेगळ्या, पण त्यांना त्यांचे अन्न शिजवण्यासाठी सरपण हवेच. मग झाडे तोडली जातात.

शेवटी व्हायचे तेच झाले. या बेसुमार वृक्षतोडीमुळे सारा देश उजाड झाला. देशातील वनस्पती लयास गेली आणि मग या नाठाळ माणसाच्या लक्षात आले, की पर्यावरणाचा तोल बिघडला आहे ! झाडे कमी झाली, तसा पाऊस कमी झाला. माणसे वाढली, पाण्याचा उपसा अखंड चालू राहिला. त्यामुळे जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी खाली गेली. आता माणसाला पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळणे कठीण झाले आहे. सगळ्या जगापुढेच हा प्रश्न उभा राहिला आहे.

मग मात्र माणूस खडबडून जागा झाला. स्वतःला वाचवण्यासाठी झाडांना वाचवले पाहिजे, हे त्याच्या लक्षात आले. आता कुणी झाड तोडू लागला की चारजण धावून त्याचा हात धरतात, त्याला वृक्षतोड करू देत नाहीत. प्रत्येक मंगलप्रसंगी वृक्षारोपणाची कल्पना आपण आता स्वीकारली पाहिजे. घरात बाळ झाले, झाड लावा. बाळाबरोबर झाडाला वाढवा. पाहुणे आले; त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करा. इतकेच नाही तर घरातील प्रियजनांच्या वियोगप्रसंगी 'स्मृतिवना'त झाड लावून त्यांच्या स्मृती जतन केल्या,पाहिजेत. जंगलतोडीच्या चुकीचे परिमार्जन झाडे लावूनच करायचे आहे. अगदी खेडोपाडी, समाजाच्या तळागाळापर्यंत हा विचार पोचवायचा आहे. त्यातच आपल्या देशाचा उत्कर्ष आहे.

Answered by ItsShree44
0

Answer:

हवा, पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली मुक्त देणगी आहे. पाणी हे जीवनावश्यक असल्यामुळे पाण्याच्या टंचाईची समस्या सोडवण्याला अग्रदयावालागतो लागतो.

खेड्यापाड्यांतून ही समस्या फारच बिकट आहे. शहरात ठरावीक वेळी पाणी येत असेल, तर सर्व व्यवहार झटपट उरकून पाणी भरून ठेवता येते. पण खेड्यापाड्यांतील लोकांना घडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल चालत जावे लागते किंवा गावात येणाऱ्या टँकरमधून, कष्टपूर्वक पाणी मिळवावे लागते. अर्थातच मिळालेल्या पाण्याचा उपयोग प्रथम पिण्यासाठी व अन्न शिजवण्यासाठी करणे भाग पडते. स्वच्छतेसाठी पाणीच उपलब्ध नसल्यामुळे अस्वच्छतेतून रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यास नवल काय? माणसाच्या दैनंदिन व्यवहारासाठी पाण्याची एवढी चणचण भासते, तर शेतीला आणि वनस्पतींच्या वाढीला पाण्याची गरज किती पराकोटीची असेल, याची कल्पना केलेलीच बरी !

वास्तविक, भारत हा नदयांचा देश आहे. भारताच्या काही भागांत पावसाचे पाणीही भरपूर मिळते. कोकणात व इतर अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो. पावसाळ्यात भारतातील काही नदयांना पूर येतात. ब्रह्मपुत्रा, गंगा, यमुना, गोदावरी इत्यादी नदयांना येणाऱ्या पुरांमुळे आजूबाजूच्या प्रदेशाची वाताहत झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत वारंवार येतात. याचा अर्थ असा की, उपलब्ध होणाऱ्या पाण्यापैकी ८० टक्के पाणी वाहून जाते, हे भारताचे दुर्दैव आहे.

धरण बांधून पाणी अडवणे हा त्यावरचा एक उपाय आहे. तसेच, देशभरच्या नदया एकमेकांना जोडून नदयांचे जाळेच निर्माण करण्याची एक योजना सध्या सरकारच्या विचाराधीन आहे. हा फारच मोठा फायदा देणारा उपाय आहे. पण ही योजना अत्यंत खर्चिक आणि खूप वर्षे लावणारी आहे. काही धरणांमुळे काही लोकांची सोय झाली असली तरी अजून असे कितीतरी जिल्हे आहेत की, जिथे उन्हाळ्यात लोकांना थेंबभर पाणी मिळणे मुश्कील होते.

भाक्रा-नानगल, दामोदर व्हॅली, कोयना, नाथसागर, नागार्जुनसागर अशी धरणे भारतात ठिकठिकाणी बांधली गेली, ही गोष्ट चांगली आहे. पण धरणांमुळे इतरही काही समस्या निर्माण झाल्या. धरणांमुळे खेड्यापाड्यांत वीज पोहोचली हे चांगले झाले; पण त्यामुळे विजेवर चालणारे पाण्याचे पंप वापरले जाऊ लागल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होऊन विहिरी कोरड्या पडल्या. नदयांचे पाणी धरणांकडे खेचले गेल्यामुळे नदया कोरड्या पडल्या. विजेमुळे कारखाने सुरू झाले ही गोष्ट चांगली घडली; पण कारखान्यातील दूषित पाणी नदीत सोडले गेल्यामुळे जलप्रदूषण होऊ लागले. गंगा-यमुनेसारख्या मोठ्या नदया इतक्या प्रदूषित झाल्या आहेत की, त्या शुद्ध करण्यासाठी कित्येक हजार कोटी रुपयांच्या योजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे.

पिण्याच्या पाण्याप्रमाणेच शेतीसाठीही आपल्याला पाण्याची गरज आहे. पाण्यासाठी आपण कितीही विहिरी खोदल्या वा कितीही पाण्याचे पंप बसवले, तरी ते सर्व निरुपयोगी ठरणार आहे. कारण जमिनीखालील पाण्याची पातळीच खाली खाली जात आहे. ही पातळी कशी वाढेल हे प्रथम पाहिले पाहिजे. यासाठी दोन योजना तातडीने हाती घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड करणे. झाडे आपल्या मुळांद्वारे जमिनीखालील पाण्याचे झरे धरून ठेवतात. झाडांची संख्या वाढली तर जमिनीखालील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. सध्या बेसुमार वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. म्हणून मोठ्या प्रमाणावर झाडे लावली पाहिजेत. तसेच, 'पाणी अडवा, पाणी जिरवा' ही दुसरी योजनाही युद्ध पातळीवर राबवायला हवी. यामुळेही जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. मग झरे, विहिरी, नदया यांचे पाणी आटणार नाही. पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल आणि आपले जीवन खऱ्या अर्थाने बहरू लागेल.

Similar questions