झाडे लावा,झाडे जगवा,पर्यावरण वाचवा. I want 2 minute speech on this above topic. Answer only in Marathi.
.
Answers
Answer:
झाडे लावा, झाडे जगवा!
तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डॉक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणा-या झाडांची कदर केली जात नाही? झाडे लावा, जीवन वाचवा राज्य सरकारने १ जुलै या एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. त्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर वरीलप्रमाणे मेसेज येत आहेत. वाढते तापमान, कमालीचा उकाडा, पाण्याचे दुर्भिक्ष, पावसाची अनिश्चिती या सर्वाला आपणच जबाबदार आहोत.
tree copyवाढते प्रदूषण आणि बेसुमार वृक्षतोडीतून घटते वनक्षेत्र ही यामागील कारणे सांगता येतील, याचमुळे ग्लोबल वार्मिगची झळ बसून शेती क्षेत्र धोक्यात आले आहे. पर्यावरण संतुलनासाठी वृक्षलागवडीच्या योजना वर्षोनुवर्षे चालू आहेत.
योजनेचे नाव बदलते पण वनक्षेत्राची स्थिती बदलत नाही. एकूण क्षेत्रफळाच्या तेहतीस टक्के क्षेत्रफळ वनाखाली असावे असा आंतरराष्ट्रीय मानक आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण फक्त १६.४५ टक्के आहे. विशेष म्हणजे २००७ पासून हे क्षेत्र वाढविण्यासाठी सरकारने सुमारे सात हजार कोटी रुपये खर्च केले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. याबद्दल भारताचे नियंत्रक आणि लेखापरीक्षकांनी (कँग) आक्षेप नोंदवला आहे.
२००७ मध्ये राज्यातील एकूण वनक्षेत्र ०५,६५० चौरस किमी होत. २०१५ अखेरीस हेच क्षेत्र ५०,६२८ चौ. किमी म्हणजे २२ चौ. किमी घटले आहे. आंतरराष्ट्रीय मानांकानुसार वृक्षारोपणानंतर तीन वर्षाने किमान ४० टक्के झाडे जगणे अपेक्षित असतात. महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण २० टक्केपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. म्हणूनच राज्य वृक्ष शासनाचे १ जुलै रोजी ‘एकच लक्ष, दोन कोटी वृक्ष’असा नारा लागावत वृक्षलागवडीची मोहीम हाती घेतली आहे. ती लोकचळवळ बनल्यास यशस्वी होईल.
नुकतेच कणकवली नऊ सामाजिक संस्थांच्या मदतीने ११००० झाडे लावण्यात आली आहेत. या नऊ संस्थांनी या लागवड केलेल्या झाडांच्या निगरानीचीही जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे कणकवली शहराची हिरवाई नक्कीच वाढेल. याप्रमाणे या दोन कोटी वृक्षलागवडीत अपेक्षित आहे.
याचबरोबर शहरातील घरांमधील प्लास्टिक पिशव्यांचा रोपे तयार करण्यासाठी पुनर्वापर झाल्यास कुजणा-या प्लास्टिक घनकच-यांची समस्या कमी होईल, प्रत्येक घरात दूध, तेल, किराण समान कुंटुंबाकडून दरवर्षी किमान ५०० पिशव्या रोपे तयार करण्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. याच पिशव्यांमध्ये त्याच्या घरात येणा-या विविध फळांच्या बिया रुजवल्यास मोठय़ा प्रमाणात लागवडीची रोपेही उपलब्ध होऊ शकतात आणि या मंडळींचा वृक्षलागवडीत सक्रिय सहभाग होऊ शकतो.
Hope it's help
mark as brainlist
Nitya❣️
Answer:
good walla morning
what's up
breakfast kiha