* (४) 'झाडापासून आनंदी जीवन शिकावे' या विधानातील
विचार स्पष्ट करा.
Answers
Answered by
19
Answer:
जो खांडावेया घावो घाली । की लावणी जेयाने केली । त्या दोहोशी एकुचि सावली । वृक्ष जैसा ।। ' अशी ज्ञानेश्वर माऊलींनी एक ओवी लिहिली आहे . ' जो वृक्षाची लागवड करतो व जो वृक्ष तोडतो , यामध्ये झाड कधी भेदभाव करीत नाही . दोघांना तो सारखीच सावली देतो . सुखदुःखातील झाडाची ही अविचल वृत्ती माणसाने आत्मसात करायला हवी . झाड सर्वांना पाने , फुले , फळे व निवाऱ्यासाठी लाकूड देते . ते परोपकारामध्ये आनंदी जीवन जगते . पशुपक्षी व माणसे यांना ते निवारा देते , म्हणजे झाड दानशूर आहे . वसंत ऋतू असो वा पानगळीचा ऋतू असो , फुलणे - बहरणे हा स्वधर्म ते सोडत नाही . आनंदाने जीवन जगते . अशा गुणसंपन्न झाडापासून माणसाने आनंदी जीवन शिकावे व आयुष्य सफल करावे .
Answered by
6
please mark me as brainliest
Attachments:
Similar questions