History, asked by pratikpawar73051, 1 day ago

झाड व पक्षांमधील संवाद मराठी मध्ये लिहा​

Answers

Answered by sudarshanbaghel108
10

Answer:

Interaction between trees and particular

Answered by Sauron
48

उत्तर :

संवाद लेखन :

(झाड चिंताग्रस्त अवस्थेत बसलेला)

पक्षी :- अरे झाड दादा, एवढे कसल्या विचारात मग्न आहात? किती वेळा पासून पाहतो आहे तुम्हाला.

झाड :- अरे पक्षी दादा काही विशेष नाही.

पक्षी :- तरी पण मला सांगा काही समस्या असेल तर त्यासाठी काही मदत लागली तर मी अवश्य करेन.

झाड :- मी काही दिवसांपासून पाहतो आहे. माझ्या आजूबाजूच्या रस्त्यांच्या दुतर्फा लावलेली झाडे काहीही कारणास्तव कापली जातात. त्यामध्ये बरीचशे माझे काही मित्र आहेत. देव न जाने ती वेळ माझ्यावर पण कधी येईल या चिंतेने मी त्रस्त आहे.

पक्षी :- अरेरे! हे तर खूपच वाईट घडले तुमच्या मित्रांसोबत. आणि हो मी पण पाहिले आहे माझी बरीचसे मित्र घर शोधत आहे.

झाड :- मानव प्रगती करत आहे ही चांगली गोष्ट आहे पण त्यामुळे तो निसर्गाचे केवढे मोठे नुकसान करत आहे ते विसरून चालला आहे. पृथ्वीवरील आमचे प्रमाण कमी झाले तर अनेक समस्या उद्भवतील याचे त्याला भान नाही.

पक्षी :- अरे बाबा! सगळ्यात नुकसान तर आमचं होईल. आणि हो, अनेक मोबाईल टॉवर लावण्यासाठी झाड कापली तर आहेत पण त्याच्या मुळे (तरंगामुळे) माझी अनेक मित्रांची जीव धोक्यात आले आहे.

झाड :- यावर आपण काहीच करू शकत नाही. 'विनाशकाले विपरीत बुद्धि' हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

पक्षी :- अगदी बरोबर म्हणालात बुवा तुम्ही.

Similar questions