झुळूक कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण तुमच्या शब्दांत लिहा.
Answers
Answered by
9
ANS : कवी दामोदर कारे यांनी लिहिलेली झुळूक ही कविता मला फार फार आवडली. झुळूक झाल्यावर अनुभवायला मिळणाऱ्या गमतीजमतींचे फार सुरेख वर्णन यात आले आहे. एक छोटीशी झुळूकही आपल्या परीने इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करू शकते, सर्वत्र चैतन्य, उत्साहाचे वातावरण निर्माण करू शकते, हा या कवितेतील विचार मला खूप आवडला. ही कविता वाचताना, म्हणताना प्रत्येक शब्दाशब्दात एक ताल, नाद निर्माण होतो. त्यामुळे, कविता लगेच पाठ होते व तालासुरात म्हणायलाही गंमत येते. कवीने वर्णन केलेल्या प्रत्येक गोष्टीचे चित्र डोळ्यांसमोर साकार होते. कवीने केलेल्या सर्व कल्पना फारच मनोरंजक आहेत. हे वर्णन वाचून झुळुक जणू काही एक व्यक्ती म्हणून आपल्यासमोर येऊन स्वत:चे मनोगत व्यक्त करत आहे, असे वाटते. यामुळे, मला ही कविता फार आवडते.
Explanation:
please make me as a brainliest...
Similar questions