India Languages, asked by Atharva6969, 9 months ago

झोपडी व महालातील संवाद लेखन करा​

Attachments:

Answers

Answered by SugaryHeart
17

Answer:

नमस्कार मित्रांनो,

सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "या झोपडीत माझ्या" या कवितेतील आहे. या कवितेचे कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आहेत. सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काहीही संबंध नसतो. कारण सुख-दुःख या मानवी मनाच्या भावना असतात. लहानश्या झोपडीतही शांतीसुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो, याचे वर्णन कवितेत केले आहे.

★ झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

झोपडी : मला साधेपणाने राहायला आवडते.

महाल : तुला दारिद्र्यात राहायची सवय आहे का? माझ्याकडे सगळं आहे. मी खूप थाटात आहे.

झोपडी : मोठेपणाचा बडेजाव काही कामाचा नाही. तू स्वतःला कैद करून जागतोस आणि मी निसर्गाच्या सानिध्यात.

महाल : तू खोट्या स्वभावाची आहेस. माझ्याकडे मऊ बिछाना आणि झुंबरांचा लखलखाट आहे.

झोपडी : पण ह्या सगळ्या नाशिवंत गोष्टी आहेत. मनाचे समाधान हेच खरे वैभव आहे. तुझ्याकडे येण्या जाण्याचा कायम मज्जाव असतो आणि चोरांची कायम भीती असते मनात.

महाल : हो ग त्याचा तर मी विचारच नाही केला

झोपडी : हरकत नाही तसही आपलं काम एकाच आहे. माणसांना निवारा देणं.

महाल : खरे आहे तुझे. तू सांगितल्या त्या गोष्टींचे मी आचरण करील.

धन्यवाद...

Hope it helps pls mark as brainlist and follow me pls pls pls

Answered by rojapalli004
1

Answer:

Explanation:

संवाद लेखन झोपडी व महाल

Similar questions