झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
झोपडी : ..................................................................................
महाल : ....................................................................................

Answers
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "या झोपडीत माझ्या" या कवितेतील आहे. या कवितेचे कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आहेत. सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काहीही संबंध नसतो. कारण सुख-दुःख या मानवी मनाच्या भावना असतात. लहानश्या झोपडीतही शांतीसुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो, याचे वर्णन कवितेत केले आहे.
★ झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
झोपडी : मला साधेपणाने राहायला आवडते.
महाल : तुला दारिद्र्यात राहायची सवय आहे का? माझ्याकडे सगळं आहे. मी खूप थाटात आहे.
झोपडी : मोठेपणाचा बडेजाव काही कामाचा नाही. तू स्वतःला कैद करून जागतोस आणि मी निसर्गाच्या सानिध्यात.
महाल : तू खोट्या स्वभावाची आहेस. माझ्याकडे मऊ बिछाना आणि झुंबरांचा लखलखाट आहे.
झोपडी : पण ह्या सगळ्या नाशिवंत गोष्टी आहेत. मनाचे समाधान हेच खरे वैभव आहे. तुझ्याकडे येण्या जाण्याचा कायम मज्जाव असतो आणि चोरांची कायम भीती असते मनात.
महाल : हो ग त्याचा तर मी विचारच नाही केला
झोपडी : हरकत नाही तसही आपलं काम एकाच आहे. माणसांना निवारा देणं.
महाल : खरे आहे तुझे. तू सांगितल्या त्या गोष्टींचे मी आचरण करील.
धन्यवाद...
Explanation:
झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
झोपडी : तू किती मोठी आणि मी लहान !
महाल : हो ग खर आहे तुझं. पण बघ ना ! मी फक्त आकाराने मोठा आहे. तुझ्यात राहणारी माणसं मनाने किती मोठी आहेत. किती आनंदी जीवन जगतात ते.
झोपडी : तुझे म्हणणे खरंच बरोबर आहे.
महाल : नुसता वरवरचा दिखाऊपणा काय कामाचा ?
झोपडी : हो माझ्या घरी येण्यास कोणालाही अटकाव नसतो.
महाल : आणि माझ्या घरात येण्यास परवानगी घ्यावी लागते.
झोपडी : माझ्या घरात ना तिजोरी ना कुलूप.
महाल : पण माझ्या दारात पहारेकरी.
झोपडी : माझ्या घरात निसर्गाचे सानिध्य.
महाल : माझ्या घरात कृत्रिमतेचा वास.
झोपडी : माझ्या घरात समाधानी माणसं.
महाल : हो रे बाबा तुझं बरोबर. माझा फक्त डोल मोठा पण खर्या अर्थाने मोठी तर तूच आहेस.