Social Sciences, asked by samsanjayjoshi, 11 months ago

कोडी- ओळखा पाहू मी कोण?

१. पुरूष असून पर्स वापरतो
वेडा नसून कागद फाडतो
असा माणूस कोण ?

२. पाणी नाही, पाऊस नाही, तरी रान कसं हिरवं
कात नाहि, चुना नाही, तरी तोंड कसं रंगल?

३. बत्तीस चिर्‍यांमधे नागिण फिरे

४. खण खण कुदळी, मण मण माती
इंग्रजांनी राज्य घेतले मध्यराती

५. हरीण पळतंय, दूध गळतयं

६. एव्हढिशी नार, तिचा पदर फार

७. सुपभर लाह्या, त्यामध्ये रुपया

८. चार आले पाहुणे, चार केले घावणे
प्रत्येकाच्या तोंडात दोन दोन

९. इतकासा गडू पाहुन येते रडू

१०.लाल पालखी हिरवा दांडा

११.कोकणातनं आला भट
धर की आपट

१२.हिरवी पेटी काट्यात पडली
उघडून पाहिली तर मोत्याने भरली

Answers

Answered by shishir303
10

सर्व कोडीची उत्तरे खालीलप्रमाणे असतील...

१. पुरूष असून पर्स वापरतो , वेडा नसून कागद फाडतो , असा माणूस कोण ?

▬ बस कंडक्टर

२. पाणी नाही, पाऊस नाही, तरी रान कसं हिरवं

कात नाहि, चुना नाही, तरी तोंड कसं रंगल?

▬ पोपट

३. बत्तीस चिर्‍यांमधे नागिण फिरे

▬ दाँत अणि जीभ

४. खण खण कुदळी, मण मण माती

इंग्रजांनी राज्य घेतले मध्यराती

▬ घड्याळ

५. हरीण पळतंय, दूध गळतयं

▬  जातं

६. एव्हढिशी नार, तिचा पदर फार

▬ लसून

७. सुपभर लाह्या, त्यामध्ये रुपया

 ▬ चंद्र आणि चांदण्या

८. चार आले पाहुणे, चार केले घावणे

प्रत्येकाच्या तोंडात दोन दोन

▬  खाट

९. इतकासा गडू पाहुन येते रडू

▬ कांदा

१०.लाल पालखी हिरवा दांडा

▬ हिरवी मिरची

११.कोकणातनं आला भट

धर की आपट

 ▬ नारळ

१२.हिरवी पेटी काट्यात पडली

उघडून पाहिली तर मोत्याने भरली

▬ भेंडी

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬  

इतर काही मनोरंजक कोडे....►  

अशी कोणती वस्तू आहे जी समोरुन देवाने बनवली आहे अणि माघून मानसाने बनवली आहे?  

https://brainly.in/question/5207438  

═══════════════════════════════════════════  

हे कोडे छान आहे.  

या कोड्यात दोन अक्षरी शब्द दिलेला आहे . त्यात पहिले चौथे अक्षर घालून चार अक्षरी शब्द तयार करायचा आहे .  

उदा.  

यंत्र - नियंत्रण  

बोध - प्रबोधन  

१ योगी  

२ वट  

३ गाव  

४ टांग  

https://brainly.in/question/16709270

Answered by Anonymous
2

Answer:

Explanation:

1) Bus Conductor

2)Watermelon

3)Teeth

4)Ghadiyaal

5)May month

6)सुपभर लाह्या त्यात एक रुपया :-चंद्र आणि चांदण्या

12)हिरवी पेटी काट्यात पडली,उघडून पाहिली तर मोत्याने भरली :-भेंडी

11)कोकणातनं आला भट ,धर की आपट :- नारळ

Similar questions