किंगफिशर/धीवर/खंड्या या पक्ष्यावर निबंध लिहा
Answers
चिमणीच्या आकाराचा रंगीत पक्षी म्हणजेच किंगफिशर होय, यालाच 'खंड्या' किंवा 'धीवर' असे सुद्धा म्हणतात . निळ्या रंगाची पाठ आणि पोट, गळ्याचा रंग केशरी , पाय गडद लाल, लांब चोच व लहानशी शेपटी असणारा खंड्या खूप सुंदर पक्षी आहे . विशेषतः खंड्या हा पक्षी पाण्याच्या जवळ राहणार आहे . पाण्यातील लहान मासे,बेडूक हे त्याचे आवडते खाद्य आहे . हा पक्षी उंच आकाशात वेगाने उंच उडतो . तसेच आपली शिकार घेऊन झुडपात बसून आरामात खातो. याचे सुंदर दिसणे निसर्ग प्रेमींना व जनमाणसांना भुरळ घालते .
■■"किंगफिशर", या पक्ष्यावर निबंध■■
किंगफिशर या पक्ष्याला 'खंड्या' किंवा 'धीवर' असे म्हटले जाते. किंगफिशरच्या जवळजवळ ८७ प्रजाती जगभरात पहायला मिळतात. या पक्षीचे सरासरी जीवनकाळ ६-१० वर्ष असते.
किंगफिशर उंच आकाशात वेगाने उडतो. हा पक्षी नदीच्या किंवा पाण्याच्या स्त्रोताच्या आसपास राहतो. भारतामधील समुद्रकिणाऱ्याच्या क्षेत्रांमध्ये हा पक्षी सगळ्यात जास्त आढळतो.
किंगफिशरच्या शरीराचा रंग निळा किंवा हिरवा आणि छातीचे रंग लाल किंवा केशरी असते. या पक्ष्याचे डोके मोठे, लांब चोच,आखूड पाय व लहानशी शेपूट असते.
किंगफिशरच्या डोळ्यांची दृष्टि उत्कृष्ट असल्यामुळे, तो आरामात त्याचा शिकार शोधू शकतो. हा पक्षी पण्यातील लहान मासे, लहान पक्षी, बेडूक,कीडे आणि गोगलगाय खातो.
किंगफिशर रूपाने खूप सुंदर पक्षी असून, निसर्ग आणि पक्षीप्रेमींना हा पक्षी पाहायला फार आवडते.