काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात , पुढं विशाल सागराचं रूप | धारण करतात , काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात , तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात . आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यांपैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल . त्यांच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले . अनुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर | झाली . थोर शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच त्याग , कष्ट आणि निःस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाफ होता . वयाच्या केवळ तेराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला . विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच , म्हणजे केवळ सहा महिन्यांतच त्यांच्या इवल्याशा कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचंच पुसून टाकलं . भातुकलीचा खेळ मोडला ; पण छोट्या | अनूनं आभाळाएवढं दुःख पचवलं . कोलमडून टाकणारं वादळ पचवलं . ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले . दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या , त्या कधीही पराभूत न होण्यासाठी . त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं . बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली . समाजव्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं . बाल ग्रामशिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्वप्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ केला आणि ताराबाईच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या . | ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं .
1. वरील उतारा वाचल्यावर अनुताई वाघांची तुमच्या मनात निर्माण झालेली प्रतिमा तुमच्या शब्दांत लिहा .
Answers
Answer:
नालायक म रम । रत रानालयात . 5
Answer:
अनुताई वाघ या जव्हार येथील आदिवासी पट्ट्यात राहणाऱ्या एक महिला होत्या. अतिशय लहान वयात त्यांचे लग्न झाले आणि नियतीने त्यांचा घात केला. काही समजण्याच्या अगोदरच संसाराची वेल फुलण्याया अगोदरच त्यांच्या पतीचे निधन झाले आणि आभाळभर दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला. अशा बिकट प्रसंगाला तोंड देऊन न खचता त्यांनी संघर्ष केला आणि समाजातील प्रत्येकापर्यंत शिक्षण कसे पोहोचवता येईल यासाठी त्यांनी अहोरात्र काम केले.
दु:खाला पचवून, संघर्ष करून, एका नव्या उमेदीने त्या उभ्या राहिल्या आणि आपला आदर्श जगासमोर ठेवला. फक्त स्वतःसाठी न जगता समाजातील इतरांसाठी जगण्याचे ध्येय त्यांनी ठरवले आणि त्यामुळेच त्यांचे कार्य हे अतिशय महान कार्य झाले. ताराबाई मोडक यांनी चालू ठेवलेले महान कार्य त्यांनी चालूच ठेवले व त्यांचा वारसा चालवला. सतत दूसर्यासाठी जगणे, लोकांपर्यंत ज्ञान पोहोचवणे, संकटाला नेहमी सामोरे जाणे आणि आभाळाएवढे मन मोठे करणे हे अनुताई वाघ यांचे गुणधर्म होते.