काही वनस्पतींची उंची वाढलेली दिसते तर काही वनस्पतींची वाढ दिसते कारण लिहा
Answers
Answer:
आपण उपसृष्टीतील बीजपत्री या वनस्पती गटाविषयी माहिती पाहूया. उपसृष्टीमधील बीजपत्री या गटातील वनस्पतींमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असतात. या ऊती बिया तयार करतात. त्यामुळे या वनस्पतींना ‘बीजपत्री’ असे म्हणतात. अनावृत्तबीजी या वनस्पतीची पाने सुईसारखी असून यांचा आकार शंकूसारखा असतो. समशीतोष्ण वातावरण असणाऱ्या परिसरात या वनस्पती आढळतात. यांनाच सुचिपर्णी वृक्ष असेही म्हणतात. अनावृत्तबीजी गटातील वनस्पती सदाहरित असतात. म्हणजेच कोणत्याही ऋतूत या वनस्पती हिरव्यागार असतात. तसेच या वनस्पती बहुवार्षिक व काष्ठमय असतात. काष्ठमय म्हणजेच त्यांचे खोड भक्कम लाकडाचे असते. आणि खोडाला फांद्या नसतात. या वनस्पतींची नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येतात. या वनस्पतीच्या बीजांवर आवरण नसते व यांना फळे येत नाहीत म्हणून या वनस्पतींना अनावृत्तबीजी असे म्हणतात.