India Languages, asked by Nimay20, 11 months ago

का कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा.
किती पाऊस पडला काल रात्री (विधानार्थी करा)
ii) प्रवासात भरभरून बोलावे (आज्ञार्थी करा)​

Answers

Answered by rajraaz85
2

Answer:

१.काल रात्री खूप पाऊस पडला.

२. प्रवासात भरभरून बोला.

Explanation:

विधानार्थी वाक्य-

वाक्याचे वेगवेगळे प्रकार पडतात त्यानुसार या वाक्यात साधे विधान केले असते. व त्या विधानाचा सरळ सरळ असा अर्थ असतो. व त्यातून कुठलाही प्रश्न विचारला नसतो. त्यावेळी त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ.

१. अंजली शाळेत जाते.

२. मधुरा दररोज मंदिरात जाते.

३. राजेश त्याचा गृहपाठ पूर्ण करतो.

४. सोनालीला फिरायला आवडते.

वरील वाक्यांमध्ये फक्त विधान केले आहे म्हणून ते वाक्य विधानार्थी वाक्ये आहेत.

आज्ञार्थी वाक्य-

केलेल्या विधानातून जेव्हा करता कोणती तरी आज्ञा देत असतो त्यावेळेस त्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.

उदाहणार्थ-

१. भरभरून पाणी प्या.

२. पोट भरून लाडू खा.

Similar questions