कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट मराठी मध्ये
Answers
Answer:
एका जंगलात एक कोल्हा भुकेने व्याकूळ झाला होता, तर दुसरीकडे एक कावळा, मांसाचा मोठा तुकडा तोंडात धरून उडाला, तो एका उंच झाडावर जाऊन बसला. अन्नाच्या शोधात फिरत असलेल्या कोल्ह्याने त्या कावळ्याला पाहिले. कावळ्याच्या चोचीतला तो मांसाचा तुकडा पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. आधीच भुकेने तो कासावीस झाला होता. त्यामुळे तो मांसाचा तुकडा कसा मिळवायचा, याचा कोल्हा विचार करू लागला.
कोल्हा खूप धूर्त होता. तो त्या झाडाखाली गेला आणि मोठय़ा कावेबाजपणे कावळ्याच्या सौंदर्याची तारीफ करू लागला. तो म्हणाला, ‘अरे पक्ष्या, मी तुला खरेच सांगतो, तुझ्यासारखा देखणा पक्षी माझ्या पाहण्यात आजपर्यंत कधी आला नाही. तुझी पिसे काय सुंदर आहेत! किती कोमल आहेत, अहाहा! तुझ्या तेजाचे काय वर्णन करायचे! तुझ्या शरीराच्या ठेवणीकडे तर पाहतच राहावे! तुझा रुबाब आणि डौल पाहता, गरुडापेक्षा तूच खरा पक्ष्यांचा राजा म्हणून शोभून दिसतोस. तुला इतके सर्व अनुकूल आहे, त्यावरून तुझा आवाजही तसाच चांगला असेल, असे मला वाटते. तो जर खरोखरच गोड असेल, तर मग तुझी बरोबरी कोण करणार?’
Answer:
एक कावळा, मांसाचा मोठा तुकडा तोंडात धरून उडाला, तो एका उंच झाडावर जाऊन बसला. ते पाहून एक कोल्हा त्या झाडाखाली गेला आणि कावळ्याच्या तोंडातले मांस उपटावे म्हणून, कपटाने त्यांच्या सौंदर्याची तारीफ करू लगला; तो म्हणतो, ‘रे पक्ष्या, मी मी तुला खरेच सांगतो, तुझ्यासारखा देखणा पक्षी माझ्या पहाण्यात आजपर्यंत कधी आला नाही. तुझी पिसे काय सुंदर ! किती कोमल १ अहाहा ! तुझ्या शरीराचे तेज किती वर्णू ! तुझ्या अवयवांच्या ठेवणीकडे तर पहातच रहावे ! तुला इतके सर्व अनुकूल आहे, त्यावरून तुझा शब्दही तसाच चांगला असेल, असे मला वाटते. तो जर खरोखरच गोड असेल, तर मग तुझी बरोबरी कोण करणार आहे!’ ही स्तुती ऐकून आपण कोण, हे कावळा विसरला आणि अंमळ नटूनमुरडून मनात म्हणतो, ‘आपल्या स्वराच्या गोडपणाबद्दल यास शंका आहे, तेवढी काढून टाकावी.’ मग त्याने गाण्यास प्रारंभ केला ! तोंड उघडताच त्यात धरलेला मांसाचा तुकडा खाली पडला, तो घेउन कोल्हा त्याच्या मूर्खपणास हसत हसत चालता झाला !
तात्पर्य:- आपल्या खोटया प्रशंसेस भुलून जे लबाडाच्या नादी लागतात, ते शेवटी बहुत करून फसतात.
या वर्गातील आणखी काही लेख
लांडगा, कोल्हा आणि वानर
अस्वल आणि कोल्हा
कोल्हा आणि मुखवटा
लांडा कोल्हा
कावळा आणि सुरई
कोल्हा आणि लांडगा
चित्ता आणि कोल्हा
उंदीर आणि वडाची फळे
बोका आणि कोल्हा
कोल्हा आणि द्राक्षे