Hindi, asked by manvimauryav09, 1 month ago

कोल्हा व करकोचा यांची मैत्री करकोच्याला खीर खाता येईना सुरईत खीर कोल्हा उपाशी. कोल्याचे मित्राला जेवायला बोलविणे उथळ थाळीत खीर करकोचा उपाशी करकोच्याचे कोल्याला बोलविणे तात्पर्य. story in marathi​

Answers

Answered by ranjeetcarpet
9

Answer:

एका कोल्ह्याचा मित्र होता एक करकोचा. करकोच्याची बरेच दिवसांनी भेट झाली म्हणून कोल्ह्यानं त्याला आपल्या घरी जेवायला बोलावले.

त्याप्रमाणे करकोचा कोल्ह्याच्या घरी गेला. तेव्हा कोल्ह्याने त्याचे मोठ्या आनंदाने आगत-स्वागत केले. नंतर कोल्हा दोन थाळ्यांत भाताची पेज घेऊन आला. त्याने एक थाळी स्वतःसाठी घेतली. दुसरी करकोच्यापुढे ठेवून तो म्हणाला, "मित्रा, खायला सुरुवात कर. पोटभर खा!"

करकोच्याला भूक लागली होती. पण त्याची चोच लांब व टोकदार असल्यामुळे त्याला थाळीतली भाताची पेज खाता येईना. कोल्ह्याने मात्र थाळीतली सगळी पेज खाऊन थाळी चाटून लख्ख केली.

कोल्ह्याने जेवायला बोलावून आपली चांगली फजिती केली हे करकोच्याने केव्हाच ओळखले. पण तो गप्प बसला.

पुढे काही दिवसांनी करकोच्याने कोल्ह्याला आपल्या घरी जेवायला बोलावले. करकोच्याने दोन सुरया आणल्या. सुरयांत खीर होती. एक सुरई कोल्ह्यापुढे ठेवीत तो म्हणाला, "मित्रा, स्वस्थपणे जेव!"

असे म्हणून करकोच्याने आपल्या लांब चोचीने सुरईतली सर्व खीर खाऊन संपविली.

पण कोल्होबाचे तोंड सुरईत जाईना. खीर खायची इच्छा असून सुद्धा त्याला ती खाता येईना. तो करकोच्याच्या तोंडाकडे पाहतच बसला.

करकोच्याने आपली खीर संपविली आणि स्वस्थ बसलेल्या कोल्ह्याकडे बघत तो म्हणाला, "अरे मित्रा, तू तर खिरीला तोंड लावलं नाहीस. तुला ती आवडली नाही का?"

कोल्हा काय उत्तर देणार?

जशास तसे

Similar questions