कील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी कोण होते?
पुरंदरचा तह कोणकोणत झाला?
Answers
Answer:
पुरंदरचा तह मीरजाराजे आणि शिवाजी महाराज यांच्यात झाला.
Answer:
१.मायनाक भंडारी व दौलत खान हे शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी होते. शिवाजी महाराजांनी जावळी व रायगड ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आरमाराची बांधणी करायला पाहिजे असे वाटू लागले.
कारण ज्याचे आरमार त्याचा समुद्र असे शिवाजी महाराजांचे मत होते. शत्रूवर जबर कशी करता येईल यासाठी शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली. तरांडी, गलबते, गुराब, तारवे, शिबाड या प्रकारची जहाजे शिवाजी महाराजांच्या आरमारात होती. जहाज बांधणी साठी लागणारे लाकूड कोकण व वसई यांच्या आसपास चांगले मिळत असे.२०० जहाजांचा एक सुभा शिवाजी महाराजांच्या आरमारी व्यवस्थेत केला जात होता.
२.पुरंदरचा तह मिर्झाराजे जयसिंग व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात झाला होता. मुगलांच्या पुढेआता आपले काहीच चालणार नाही. आणि राजांची युक्तीही काम करत नव्हती. म्हणून शिवाजी महाराजांनी तह करण्याचे ठरवले.
पुरंदर गडावर झाल्यामुळे या तहाला पुरंदरचा तह असे म्हटले जाते. या तहात शिवरायांनी मुघलांना तेवीस किल्ले व किल्ल्याच्या खालील चार लक्ष होनांचा प्रदेश देण्याचे कबूल केले. होन हे शिवाजी महाराजांच्या काळातील चलन होते.