History, asked by preetisutkar9788, 4 months ago

केली. दुसन्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर​

Answers

Answered by anushkasiyaram
3

Answer:

.....................

Answered by tanuja200746
4

Hi How are you

Here is your answer Mate

Answer:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो.हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला 'समता दिन' म्हणून तर महाराष्ट्र शासन ज्ञान दिन म्हणून साजरा करते.

बाबासाहेबांच्या प्रत्येक जन्मदिवशी त्यांचे अनुयायी त्यांचे जन्मस्थळ भीम जन्मभूमी स्मारक तसेच दीक्षाभूमी, चैत्यभूमी, इतर संबंधित स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, शहरे, गावे, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. जगातील १०० पेक्षा अधिक देशांत आंबेडकर जयंती साजरी केली जाते.

आंबेडकर जयंती ही एक प्रादेशिक सुट्टी नेहमीच १४ एप्रिल रोजी पाळली जाते. आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आंबेडकर जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते. भारतील अन्य कोणत्याही ऐतिहासिक किंवा पौराणिक व्यक्तीपेक्षा आंबेडकरांच्या जयंतीची सार्वजनिक सुट्टी सर्वाधिक राज्यांत असते.

नवी दिल्ली, भारतीय संसदेमध्ये त्यांच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला दरवर्षी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभापती, राज्यपाल, इतर मंत्री व सर्व राजकिय पक्षाचे राजकारणी आणि आंबेडकरवादी जनता अभिवादन करून त्यांना आदरांजली देतात. भारतीय बौद्ध धर्मीय बुद्ध विहार तसेच आपल्या घरातील आंबेडकरांच्या प्रतिमेला वा पुतळ्याला समोर ठेवून त्रिवार वंदन करतात. विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, लोक संचालन करतात, ढोल वाजवून नृत्य करून आनंद व्यक्त करत मिरवणूक काढतात. दलितेतर लोकही आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहाने त्यांची जयंती साजरी करतात

Explanation:

Hope it will helpful to you

Please mark as brilliant

Similar questions