History, asked by ssghadge97, 3 months ago

कालगणना या संकल्पने विषयी थोडक्यात माहिती ​

Answers

Answered by SmitaMissinnocent
26

Answer:

भारत देशाचे म्हणून एक राष्ट्रीय कॅलेंडर इ.स. १९५७ मध्ये अस्तित्वात आले. भारत सरकारकडून नेमण्यात आलेल्या मेघनाथ सहा समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार भारतीय सौर कालगणना सुरू झाली.

या कालगणनेचा पहिला दिवस २२ मार्च (लीप वर्षी २१ मार्च)असतो. त्या दिवशी भारतीय सौर चैत्र महिन्याची पहिली तारीख असते. भारतीय सौर कालगणनेमध्ये इसवी सनाच्या वर्षाचा क्रमांक वापरत नाहीत, त्याऐवजी शालिवाहन शकाचा क्रमांक वापरतात. शालिवाहन शकाचा क्रमांक=इसवी सनाचा १ जानेवारी ते २१ मार्च या काळातला क्रमांक उणे ७९ आणि २२ मार्च ते ३१ डिसेंबर या काळातला इसवी सनाचा क्रमांक उणे ७८. उदा० १ जानेवारी २०१० ते २१ मार्च २०१० या काळात भारतीय सौर पंचांगाचे वर्ष (२०१०-७९=) १८३१, आणि २२ मार्च २०१० ते ३१ डिसेंबर २०१० या काळात (२०१० उणे ७८=) १८३२. हा भारतीय सन१८३२, २१ मार्च २०११पर्यंत होता; २२ मार्च पासून १८३३ सुरू झाला.

इ.स.२०१२ हे लीप वर्ष आहे, त्यामुळे (२०१२-७८=)१८३४ हे भारतीय वर्ष २१ मार्च २०१२ला सुरू झाले.

Similar questions