काळा खडक ,पिवळे पाणी आत पोहते चंदारणी कोडे सोडवा <br />
Answers
काळा खडक, पिवळं पाणी, आत पोहते चंदाराणी ➲ कढई, तेल, पुरी
आजून काही कोडे...
२. काळी काठी, तेल लाटी, वाकते पण मोडत नाही ➲ डोक्यावरचे केस
३. तळ्यात तळं, तळ्यात खांब, शेपटीने पाणी पितो गंगाराम ➲ समई, तेल, वात
४. दोन भाऊ शेजारी, भेट नाही संसारी ➲ डोळे
५. काळ्या कोठारात म्हातारी मेली, पाचजण असून दोघांनी नेली ➲ शेंबुड
६. बत्तीस चिरे, त्यात नागीण फिरे ➲ दात आणि जीभ
७. सुपभर लाह्या, मधे रुपय्या ➲ चांदण्या व चंद्र
८. घाटावरून आला भट, त्याचा काष्टा घट ➲ कांदा
९. आकाशातून पडली घार, रक्त प्याले घटाघटा, मांस खाल्ले पटापटा ➲ शहाळे/नारळ
१०. एवढसं पोर, घर राखण्यात थोर ➲ कुलूप
११. एवढीशी बेबी, चुलीपुढे उभी ➲ फुंकणी
१२. तार तार तारले, विजापूर मारले, बारा वर्षे तप केले, हाती नाही लागले ➲ उंबराचे फुल
१३. पाऊस नाही, पाणी नाही, रान कसं हिरवं, कात नाही, चुना नाही, तोंड कसं रंगलं ➲ पोपट
१४. लहानसे झाड, त्याला इवलासा दाणा, गरज पडली की धावत जाऊन आणा ➲ ओवा
१५. जांभळा झगा अंगावर, मुकुट घालते डोक्यावर ➲ वांगे
१६. अटांगण पटांगण, लाल रान, बत्तीस पिंपळांना एकच पान ➲ जीभ
१७. हरण पळतं, दूध गळतं ➲ दळणाचे जाते
१८. आठ तोंडे, जीभ नाही, गाणे मात्र सुरेल गाई ➲ बासरी
१९. काळी गाय, काटे खाय, पाण्याला बघून उभी ऱ्हाय ➲ चामड्याची वहाण/चप्पल
२०. वीस लुगडी, आतून उघडी ➲ मक्याचे कणीस
२१. सरसर गेला साप नव्हे, गडगड गेला गाडा नव्हे, गळ्यात जानवे ब्राह्मण नव्हे ➲ पाण्याचा रहाट
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○