कालमपानाची एकके कोणती क्रमानुसार
Answers
Answer:
एकके व परिमाणे
सर्व व्यावहारिक व प्रायोगिक शास्त्रांत मोडणार्या राशींच्या मापनाला अत्यंत महत्त्व आहे. किंबहुना निरीक्षण व मापन म्हणजेच शास्त्र असेही म्हणण्यास हरकत नाही. भौतिकीत मापनाच्या पद्धतींचा सैद्धांतिक व व्यावहारिक दृष्ट्या सांगोपांग विचार केलेला असून, त्या पद्धतींचे अनुकरण अनेक शास्त्रांत झालेले आहे.
या शास्त्रातील विविध राशींचे मापन करताना जी एकके वापरतात किंवा वापरावयाची आहेत त्या एककांच्या राशी तरी कोणत्या म्हणून निवडावयाच्या व त्याच का निवडावयाच्या व त्या कशा निवडावयाच्या, हे प्रश्न प्रथम सोडवावे लागतात. शास्त्रात मोडणाऱ्या हजारो राशींसाठी संपूर्णपणे स्वतंत्र अशी हजारो एकके निर्माण करणे हे अगदी गैरसोयीचे तर आहेच पण ते अशास्त्रीयही आहे, म्हणून इष्ट नाही. पुन्हा सर्वच राशी अगदी मूलभूत व परस्परांशी असंबंधित असतात असेही नव्हे.
मूलभूत राशी व त्यांवर आधारलेल्या एकक पद्धती : कोणत्याही राशीच्या मापनास अवकाश, वस्तुमान व काल या तीन प्रमुख व मूलभूत राशी गृहीत धरणेच सोईस्कर व इष्ट आहे, असा अनेक शतकांच्या अनुभवातून व प्रगतीतून निघालेला निष्कर्ष आहे. विशिष्ट शाखेतील राशींच्या मापनास वरील तीन मूलभूत राशींशिवाय आणखी तीन सोईस्कर राशी मूलभूत म्हणून स्वीकारणे जरूर पडते हा अलीकडील निष्कप्ष आहे. अवकाश, वस्तुमान व काल या मूलभूत राशींवर आधारित अशा एकक पद्धतीस केवल किंवा स्वेच्छ एकक पद्धती असे म्हणतात. वस्तुमान या राशीचा उगम, नेहमी अनुभवास येणाऱ्या प्रेरणा या राशीतून होत असल्यामुळे मापनाच्या एका पद्धतीत अवकाश, प्रेरणा व काल या मूलभूत राशी म्हणून गणल्या गेल्या आहेत. या मापनाच्या पद्धतीस गुरुत्वीय एकक पद्धती असे नाव आहे.
अवकाश (स्थल) व काल या राशींचा अनुभव प्रत्येकास पदोपदी येतो. कोण, कोठे, केव्हा, कसे किती व काय या प्रश्नावलीमधील कोठे व केव्हा हे अनुक्रमे अवकाशसूचक व कालसूचक शब्द आहेत. व्यानहारिक शास्त्रातील सर्वच राशी या मूळ राशींनी वा मूलतत्त्वांनी बांधल्या आहेत व त्यावर आधारलेल्या आहेत. वस्तुमान किंवा द्रव्यमान ही एक निश्चित व मापनक्षम राशी आहे असे माणने भागत पडते. विद्युत् चुंबकीय राशी, ऊष्मीय राशी व प्रकाशविषयक राशी यांच्या मापनासाठी आणि परिमाणासाठी त्या त्या शाखेतील आणखी प्रत्येकी एक एक राशी मूलभूत म्हणून धरावी लागते.
Answer:
gurhjcseujdwwwdfuj
Explanation:
xxv