कामगारांच्या मोर्चा या विषयावर बातमी तयार करा
Answers
Explanation:
साखर कामगारांच्या वेतनाबाबत त्रिपक्षीय समिती स्थापन करणे आणि अन्य मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आगामी ऊस गाळप हंगामात साखर कारखान्यांची धुरांडी पेटू दिली जाणार नाही, असा इशारा साखर कामगार प्रतिनिधी मंडळाने दिला आहे.
राज्यातील साखर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना वेतन व सेवाशर्ती ठरविण्याबरोबर अन्य मागण्यांसाठी बुधवारी साखर आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. त्या वेळी हा इशारा देण्यात आला. पोलिसांनी साखर संकुलाबाहेर कामगारांना रोखल्यामुळे त्या ठिकाणी सभा घेण्यात आली; तसेच मागण्यांचे निवेदन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना देण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले, सुभाष काकुस्ते, रावसाहेब पाटील, पी. के. मुंडे, अशोक बिराजदार, डी. बी. मोहिते, राजेंद्र तावरे, सुरेश मोहिते, नितीन बेनकर आदी उपस्थित होते.
'